Headlines

Happy Friendship Day 2026 Funniest Viral Memes That Will Make You Smile | ‘पुरुषांना माहेर नसतं म्हणून मित्र असतात’, फ्रेंडशिप डेवर विनोदी मीम्स व्हायरल, पाहून हसू आवरणार नाही


Funny Friendship Memes: फ्रेंडशिप डे निमित्तानं एकापेक्षा एक मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.

Happy Friendship Day
(फोटो सौजन्य – 22gpromotions/Instagram)
२ ऑगस्ट २०२६ हा दिवस जगभरात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला. फ्रेंडशिप डे म्हणजे मित्र-मंडळींप्रती प्रेम, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवशी लोक आपल्या मैत्रीचं नातं साजरं करतात.

असो, फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं काहींनी एकमेकांना शुभेच्छा देणारे मेसेज पाठवले असतील, तर काहींनी सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या मित्रांना भेटवस्तूही दिल्या असतील. मात्र, काही जण असेही आहेत ज्यांनी धमाल मीम्स शेअर करून फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला. चला तर मग पाहूया, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काही निवडक, पण एकापेक्षा एक मजेशीर मीम्स.

फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्रीचं नातं सेलिब्रेट करण्याचा दिवस होय.

खरा मित्र तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात आपली साथ देतो.

मैत्री हे आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक असतं.

मित्रांमुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण अधिक आनंदी होतो.

फ्रेंडशिप डेच्या दिवशी लोक मित्रांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात.

विश्वास, प्रेम आणि साथ यावर खरी मैत्री टिकून असते.

सर्व मित्रांना फ्रेंडशिप डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा