Nepal Flash Flood Update: नेपाळमध्ये आलेल्या महापुरात आतापर्यंत ५५० हुन अधिक जणांचा जीव गेला. अजूनही हजार हुन अधिक जण बेपत्ता आहेत. बचाव आणि शोध कार्य सुरु असून नेपाळचा मदतीवर तिसरा विधान समोर आला आहे. सुरुवातीला आम्हाला बचावकार्यात मदत नको असं म्हंटल, त्यांनतर नेपाळने चार देशांना मदत करण्याची परवानगी दिली. आता नेपाळने नवीन विधान दिले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन विधानात काय?
परराष्ट्र मंत्री खनाल म्हणाले, नेपाळला शोध किंवा बचाव कार्यासाठी परदेशी मदतीची गरज नाही आहे. आम्हाला विशेष सेवा आणि तांत्रिक मदत हवी आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या हिमालयीन भागात आलेल्या महापुरामुळे विशेष आणि तांत्रिक क्षेत्रात तज्ज्ञांची कमतरता आहे, तिथे आम्हाला विदेशी मदतीची गरज आहे. नेपाळला बोगद्यातील बचाव कार्यांचा अनुभव कमी असल्याने अशा मोहीम राबण्याची त्यांना विशेष उपकरणे आणि तांत्रिक माहितीची आवश्यकता आहे, अशी विनंती केली आहे. कारण अजूनही रासुवा आणि नुवाकोट येथील जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये लोक अजूनही अडकलेले असण्याची शक्यता आहे.
भारताचा तातडीने प्रतिसाद
नेपाळने केलेल्या विनंतीला भारताने तातडीने प्रतिसाद दिला. परराष्ट्र मंत्री रणधीर जैस्वाल यांनी बोगद्यात अडकलेल्यांना काढण्यासाठी बचाव पथक पाठवण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी तेथील परिस्थिती आणि आवश्यक उपकरणे जाणून घेण्यासाठी एक पथक केवळ पाहणी करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
नेमकं काय म्हणाले रणधीर जैस्वाल?
नेपाळने विनंती केल्यानुसार, आम्ही एक बोगद्यातील बचाव पथक पाठवण्याची तयारी करत आहोत. सुरुवातीला एक पथक तेथील नेमकी परिस्थिती आणि लागणारे उपकरण जाणून घेण्यासाठी पाठवण्यात येणार. यासोबतच आम्ही वैधकीय पथक देखील पाठवत आहोत. आम्ही ‘बेली ब्रिज’ (Bailey bridges) आणि तांत्रिक मदत करण्याची तयारी केली आहे. जेणेकरून लवकरात लवकर बाधित भाग आणि पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत मिळू शकेल. एक बेली ब्रिज नेपाळमध्ये आधीपासून उपलब्ध आहे, त्याचा वापर ते करू शकतात, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री रणधीर जैस्वाल म्हणाले. बेली ब्रिज हा एक पोर्टब्ल ब्रिज आहे. हा रस्ते आणि संपर्क तुटलेल्या भागांसाठी खूप उपयोगी असते.
चार देशांना मदतीची दिली परवानगी
नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रानुसार एका ‘Inter-Ministerial Coordination Committee’ ने भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाला मदतीची परवानगी दिली आहे. या चार देशांमधील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ नेपाळला बोगद्यातील बचावकार्य आणि डीएनए चाचणी आणि फॉरेन्सिक तपासणीच्या कामात मदत करणार. नेपाळने मदत करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या इतर देशांची विनंती स्वीकारली नाही.
नेपाळने मदत करण्याच्या परवानगी देण्यावर काय कारण?
आम्हाला विदेशी समुदायाकडून शोध आणि बचाव पथके तसेच काही तज्ज्ञांना परवानगी देण्यासाठी मोठा दबाव होता. त्यामागचे कारण असे की त्यांचे नागरिकही या पुरात बेपत्ता आहेत. असं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ‘द काठमांडू पोस्ट’ला सांगितलं.
आतापर्यंत ५५० हुन अधिक लोकांचा मृत्यू
अचानक आलेल्या या पुरामुळे भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांच्या काठावरील वस्त्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारपर्यंत ५५० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १९२४ लोक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता नागिकांमध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची असल्याचे समोर आले आहे. चीन, अमेरिका, युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या नागरिकांचा बेपत्ता विदेशी नागरिकांमध्ये समावेश आहे.

