Headlines

Nagpur Fraud: बनावट सोन्यावर 23 कोटींचे कर्ज; ऑडिटमध्ये गैरव्यवहार उघड, आठ आरोपींना अटक – nagpur bank duped rs 23 crore fake gold loan fraud 8 arrested


Nagpur Fake Gold Loan Fraud Case: बँकेत बनावट तारण ठेवून तब्बल २३ कोटी रुपयांचे गोल्ड लोन घेतले प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ८ जणांना ताब्यात घेतले आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-29T164044
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून विविध शाखांमधून कोट्यवधी रुपयांचे गोल्ड लोन उचलण्यात आल्याचा गैरव्यवहार आर्थिक गुन्हेशाखेने उघडकीस आणला आहे. आतापर्यंत १५२ गोल्ड लोन खात्यांची तपासणी करण्यात आली असून, बँकेची सुमारे २३ कोटी ३१ लाख ८४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

१८ ऑक्टोबर २०२५ रोजी गोल्ड लोनच्या नियमित ऑडिटदरम्यान एका खात्यातील तारण सोन्याबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर मनिषनगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन शाखांमधील खात्यांची तपासणी करण्यात आली.

Maharashtra TimesChandrashekhar Bawankule: आदिवासींवरुन काँग्रेसचे राजकारण, राहुल गांधींना राज्यात ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न; बावनकुळेंचा आरोपतपासात बनावट ग्राहकांच्या नावाने कर्ज मंजूर करणे, सोन्याचे वजन व शुद्धतेबाबत चुकीचे मूल्यांकन करणे आणि कर्जाची रक्कम वळविणे, असे प्रकार आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बँक व्यवहार, केवायसी कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल संपर्क आणि ऑडिट अहवालांची पडताळणी करण्यात आली. आरोपींच्या घरझडतीत मोबाइल, लॅपटॉप, बनावट कर्जदारांच्या याद्या आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

मुख्य आरोपी सचिन राऊतने बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट ग्राहक उभे करून कर्ज मिळविल्याचे तपासात पुढे आले आहे. मूल्यांकनकर्त्याने १५५ बनावट दागिन्यांचे मूल्यांकन केल्याचेही निष्पन्न झाले. संबंधित अधिकारी आणि ऑडिटरच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

Maharashtra TimesNagpur Crime : बारमध्ये मित्रांसोबत दारु प्यायला बसलेला, पत्नीचा फोन येताच बाहेर आला अन् तिथेच घात झाला; कुख्यात गुंडाला प्लॅन करुन संपवलंपडताळणीवरच प्रश्न
गोल्ड लोन देताना दागिन्यांची शुद्धता, वजन, मालकी आणि ग्राहकाची ओळख यांची बहुपातळी पडताळणी अपेक्षित असते. मात्र, अशा गैरव्यवहारांत मूल्यांकनकर्ते, शाखास्तरावरील अधिकारी आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे बँकांच्या गोल्ड लोन प्रक्रियेत अधिक कडक डिजिटल नोंदी, स्वतंत्र पुनर्मूल्यांकन आणि नियमित आकस्मिक तपासणीची गरज अधोरेखित झाली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा