Headlines

Nagpur News:पावसाची उसंत आणि मूर्तिकारांना दिलासा ; गणेश मूर्तिंची काम शेवटच्या टप्प्यात


म.टा.प्रतिनिधी ,नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेली विश्रांती नागपुरातील मूर्तिकारांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. पावसाच्या उघाडीमुळे गणेशमूर्ति वाळविण्यावर भर दिला जात आहे. अखेरचा हात मारण्याची तसेच रंगाचा पहिला थर चढविण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी वेळेत ऑर्डर पूर्ण होतील, असा विश्वास मूर्तिकारांकडून व्यक्त केला जात आहे.

मूर्ति घडविण्याची लगबग

गणेशोत्सवाच्या सुमारे दीड महिना आधीपासून शहरात गणेशमूर्ति बनविण्याचे काम सुरू होते. पहिल्या टप्प्यात निर्यात होणाऱ्या लहान मूर्ति तयार केल्या जातात, तर दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्ति साकारल्या जातात. सध्या शहरातील विविध भागांत मूर्ति घडविण्याची लगबग पाहायला मिळत आहे. नागपूर शहरात दरवर्षी लहान आकारातील सुमारे चार लाख गणेशमूर्ती तयार होतात.

प्रमुख मूर्तिकार सहायक कारागीरांची मेहनत

याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सुमारे तीन हजार मोठ्या मूर्ति साकारल्या जातात. यंदाही त्याच प्रमाणात मूर्तिंची निर्मिती सुरू आहे. या कामासाठी शहरातील सुमारे बाराशे ते दीड हजार प्रमुख मूर्तिकार आणि जवळपास पाच हजार सहायक कारागीर अहोरात्र मेहनत घेत आहेत.

चितारओळ, लालगंज, कुंभारपुरा, पाचपावली, बुधवारी, बाळभाऊपेठ, नवीन व जुनी मंगळवारी, मासुरकर चौक, पारडी, टिमकी, सिरसपेठ, नंदनवन, हंसापुरी आणि भानखेडा या मूर्तिकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. कार्यशाळांमध्ये मूर्तींचे आकार पूर्ण करण्यासोबतच त्यांना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू आहे.

Maharashtra TimesKolhapur Politics : मुश्रीफ आणि घाटगे एकत्र; ही युती नाही महायुती, फडणवीसांची टोलेबाजी; दिली फेविकोल जोडाची उपमा

पावसाच्या विश्रांतीमुळे कामे तुलनेने सुरळीत सुरू

नागपूरकर दमट वातावरण आणि उकाड्याने त्रस्त असले तरी सध्याचे कोरडे हवामान मूर्तिकारांसाठी फायदेशीर ठरत आहे. मूर्ती लवकर वाळत असल्याने पुढील रंगकाम आणि सजावटीची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होत आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पडणाऱ्या पावसामुळे मूर्ती वाळवण्यासाठी हेअर ड्रायरसह विविध उपाय करावे लागतात. त्यामुळे मूर्तिकारांची मोठी तारांबळ उडते. यंदा मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे कामे तुलनेने सुरळीत सुरू आहेत.

Maharashtra TimesNashik News: धरणीकंपामुळे घरांच्या थरारल्या विटा;नागरिकांत भितीचे वातावरण

गणपतीचे आगमण काही दिवसांवर

नागपूरात पावसाने घेतलेल्या विश्रांतीनेमूर्तिकार चांगलेच खुश झाले आहेत. गणपतीचे आगमण काही दिवसांवर आलेले असताना गणेशमूर्तिची काम ही अंतिम टप्प्यात आलेली आहेत. मात्र गणेश मूर्तींना रंग देण्या अगोदर त्या मूर्ती वाळल्या पाहिजेत. त्यासाठी बाहेरच वातावरण खुप पूरक ठरत.पावसाच्या वातावरणामुळे मूर्तिकारांना मूर्ति वाळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. परंतू सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मूर्तिकारांनी सुटकेचा श्वास सोडला.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत