Headlines

पोरींनो मानलं तुम्हाला! विद्यार्थिनी रस्त्यावर उतरत जेव्हा रिपोर्टर होतात, धाडसाचं सर्वत्र कौतुक


रायगडच्या कर्जत परिसरात महामार्गाचे झालेल्या दुरावस्थाचं वास्तव मांडणारा शालेय विद्यार्थिनींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील विद्यार्थिनींनी धाडस दाखवत तयार केलेल्या व्हिडीओवरुन त्यांचं कौतुक होत आहे.

Raigad News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रायगड : रायगड जिल्ह्यात एकीकडे कर्जत परिसरात कोट्यावधींचे प्रकल्प प्रस्तावित असतानाच राज्य मार्गाच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे चित्रण करून विद्यार्थिनींनी प्रशासनाचा कारभार स्वतः रिपोर्टर बनून उघड केला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दुर्दशा विद्यार्थिनींनी महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना होणारा त्रास आपल्या रिपोर्टिंगमधून समोर आणला आहे. शालेय विद्यार्थिनींनी स्वतः रिपोर्टर बनत या दुरावस्थेच चित्रण केल आहे. शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात असलेली हातातील छत्रीलाच त्यांनी बुमचे स्वरूप देत रस्त्याची दुर्दशा दाखवली आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कर्जत कोंदिवडे या राज्य मार्गावर खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा आणि यामुळे होणारा त्रास या सगळ्याची व्यथा या विद्यार्थिनींनी आपल्या या रिपोर्टमधून मांडली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रस्त्याने जाताना अनेक अडचणी

या रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे आपला प्रवास किती त्रासदायक होतो? वाहनाचा अर्धवट प्रवास थांबवून चक्क चालत जावं लागतं, इतकंच नाही तर चालत जात असताना एखादे वाहन आलं तर खड्ड्यांमुळे अंगावर उडणाऱ्या चिखलाच्या पाण्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. अंगावर चिखल उडण्याची भीती असते. या भीतीच्या सावटाखाली हा प्रवास करावा लागतो. दररोज या मार्गावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी अखेर रस्त्यावरील खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून या सगळ्याचं स्वतः रिपोर्टर होत याचे व्हिडिओ चित्रण केल आहे.

विद्यार्थिनी रिपोर्टर बनल्या

नेहमी शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी काही वेळासाठी रिपोर्टर बनल्या आणि त्यांनी एका आपल्या विद्यार्थिनी मैत्रिणीवर व्हिडिओग्राफर म्हणून जबाबदारी सोपवली. हातातल्या छत्रीलाच बूम बनवलं. एका विद्यार्थिनीने ही छत्री हातात धरून दुसऱ्या मैत्रिणीला या रस्त्याच्या त्रासाबद्दल प्रश्न विचारला. या विद्यार्थिनीनेही हा मार्ग म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हाच प्रश्न पडतो असे सांगत या रस्त्याची दुर्दशा दाखवली आहे. या शालेय विद्यार्थिनींनी अनुभवी ज्येष्ठ पत्रकारासारखे कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या त्रासामुळे दररोज होणाऱ्या त्रासाची व्यथा व्यक्त केली आहे.

बांधकाम विभागाच्या कामकाजांवर प्रश्नचिन्हं

शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराची लक्तरच या विद्यार्थिनींनी जगासमोर मांडली आहे. कोंदिवडे भागातील दोन शालेय विद्यार्थिनी या आपल्या घरी निघाल्या होत्या. त्याचवेळी त्यांना हा व्हिडिओ काढण्याची कल्पना सुचली आणि हा त्यांनी व्हिडिओ केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यावर आता तो प्रचंड व्हायरल झाला आहे. देशाचे भविष्य घडवणाऱ्या या विद्यानींनी केलेला हा व्हिडिओ, यातून केलेले रस्त्यावरील खड्ड्यांचे चित्रण ही बोलकी दृश्य समोर आणली आहेत. यानंतर तरी किमान आता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आता वाहन चालक, प्रवासी आणि कर्जत तालुक्यातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.

विद्यार्थिनींच्या धाडसाचे कौतुक

या विद्यार्थिनींनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. आवश्यक असलेल्या सार्वजनिक मूलभूत पायाभूत सुविधा मिळायल्याच हव्यात असा संदेश देणाऱ्या सजगतेचे आणि त्यांनी रस्त्यावर उतरू केलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या जनतेच्या मांडलेले व्यथा याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच यामुळे शासनाच्या बांधकाम विभागातील प्रशासनाचा बेजबाबदार कारभार जनतेसमोर आला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा