Woman with two husbands a clash leads to attack assault on new husband with a sharp weapon; तरुणाला सोडून महिलेनं दुसरा संसार थाटला, पण पहिला पती भलताच भडकला; नव्या जीवनसाथीवर भररस्त्यात हल्ला
Woman with two husbands a clash leads to attack assault on new husband with a sharp weapon; तरुणाला सोडून महिलेनं दुसरा संसार थाटला, पण पहिला पती भलताच भडकला; नव्या जीवनसाथीवर भररस्त्यात हल्ला
Nagpur News: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संदेशांमुळे निर्माण झालेला संभ्रम पोलिसांनी दूर केला आहे.
तरुणाला सोडून महिलेनं दुसरा संसार थाटला, पण पहिला पती भलताच भडकला; नव्या जीवनसाथीवर भररस्त्यात हल्ला(फोटो– Lipi)
नागपूर : एका महिलेच्या दोन पतींमधील वादातून घटस्फोटित पतीने सध्याच्या पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी महाल परिसरातील नवाबपुरा येथे घडली. या हल्ल्यात आकाश गुलाबराव ढोमने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश वानखेडे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर काही काळ बडकस चौक परिसरातही खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश ढोमने हा संबंधित महिलेचा सध्याचा पती आहे, तर गणेश वानखेडे हा तिचा घटस्फोटित पती आहे. महिलेच्या मुलाचा योग्य सांभाळ केला जात नसल्याच्या कारणावरून गणेश आणि आकाश यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून सोमवारी सकाळच्या सुमारास महाल येथील नवाबपुरा परिसरात गणेशने आकाशवर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर आकाश तेथून स्कुटरवरून निघून आला. रक्तबंबाळ अवस्थेत तो बडकस चौकाच्या दिशेने आला. यावेळी त्याच्या स्कुटरवर तसेच रस्त्यावर रक्ताचे डाग पडले होते. बडकस चौकाजवळ आल्यानंतर आकाश स्कुटरवरून खाली उतरला आणि ऑटोरिक्षा पकडून उपचारासाठी रुग्णालयात गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, आकाश नागपूरमध्ये ज्या ठिकाणी ऑटोरिक्षात बसला, ते ठिकाण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे आरएसएस मुख्यालयाजवळच एका व्यक्तीवर चाकूने हल्ला झाल्याचा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, प्रत्यक्षात हल्ल्याची घटना आरएसएस मुख्यालयाजवळ घडलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच घटनेच्या वेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचा ताफा किंवा कोणतीही व्हीआयपी मूव्हमेंट त्या परिसरात नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमका वाद, आरोपी आणि जखमी यांच्यातील पूर्वीचे संबंध तसेच घटनेतील धारदार शस्त्राबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माहिती देताना हल्ल्याची घटना नवाबपुरा परिसरात घडली असून आरएसएस मुख्यालयाजवळ हल्ला झाल्याची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा