Sharad pawar mps met prime minister narendra modi devendra fadnavis important reaction; शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटले; पक्षही भाजपसोबत येणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका
Sharad pawar mps met prime minister narendra modi devendra fadnavis important reaction; शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटले; पक्षही भाजपसोबत येणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ८ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संपूर्ण देशाचे असतात, त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी भेटण्यात काहीही वावगे नसल्याचे मत मांडले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधान हे देशाचे असतात कोणत्या पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांना कोणी भेटले तर त्यामध्ये काही वावगे नाही. मी सुद्धा मुख्यमंत्री आहे. मला देखील अनेक विरोधी पक्षांचे लोक भेटतात आणि त्यांची कामे सांगतात. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचे कारण नाही. ते पंतप्रधानांना भेटायला जाणार असतील किंवा भेटले असतील तर ही चांगली गोष्ट आहे,” अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
दरम्यान, “देशभरात सुरू असलेल्या तिरंगा रॅलीबाबतही मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी माहिती दिली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली होत आहे देशभरातही तिरंगा रॅली होत आहे. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि काल झालेला 9 ऑगस्ट करो या मरो, भारत छोडो या सप्ताहात संपूर्ण देशात तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशप्रेमाचं वातावरण तयार झालं पाहिजे, या दृष्टीने या रॅली काढण्यात आलेल्या आहेत. आज मुंबईच्या रॅलीमध्ये मी जाणार आहे, नंतर पुण्याच्या रॅलीमध्ये जाईल आणि 14 तारखेला संभाजीनगरच्या रॅलीमध्ये जाणार आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गडचिरोलीमध्ये सर्पदंशाने आश्रम शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यू झालेला आहे, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोलीतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत माहिती मागवली. गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. या प्रकरणाची अधिक माहिती मागवली आहे,” असे त्यांनी सांगितले.
नागपूरमधील नव्या भूसंपादनाच्या मुद्द्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. कोणतीही बाब लपवणे शक्य नसल्याचे सांगितले. गुगल इमेजरी आहे आणि प्रत्यक्ष ग्राउंड सर्व्हे आहे. त्यामुळे कोणाचा भूखंड किंवा जमीन सुटली असेल तर तीही समाविष्ट होईल. कोणी अनावश्यक दावा करत असेल तर त्यासाठी भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. त्या पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एफसीआरए विधेयकावरून काही अमेरिकेतील लोकांना ‘मिरची लागली’ असल्याची टिप्पणी फडणवीस यांनी केली. हे विधेयक कोणत्याही एका समुदायाच्या विरोधात नसून, परदेशातून देणगी घेणाऱ्या संस्थांना एफसीआरए ची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा