मूर्ति घडविण्याची लगबग
गणेशोत्सवाच्या सुमारे दीड महिना आधीपासून शहरात गणेशमूर्ति बनविण्याचे काम सुरू होते. पहिल्या टप्प्यात निर्यात होणाऱ्या लहान मूर्ति तयार केल्या जातात, तर दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्ति साकारल्या जातात. सध्या शहरातील विविध भागांत मूर्ति घडविण्याची लगबग पाहायला मिळत आहे. नागपूर शहरात दरवर्षी लहान आकारातील सुमारे चार लाख गणेशमूर्ती तयार होतात.
प्रमुख मूर्तिकार सहायक कारागीरांची मेहनत
याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सुमारे तीन हजार मोठ्या मूर्ति साकारल्या जातात. यंदाही त्याच प्रमाणात मूर्तिंची निर्मिती सुरू आहे. या कामासाठी शहरातील सुमारे बाराशे ते दीड हजार प्रमुख मूर्तिकार आणि जवळपास पाच हजार सहायक कारागीर अहोरात्र मेहनत घेत आहेत.
चितारओळ, लालगंज, कुंभारपुरा, पाचपावली, बुधवारी, बाळभाऊपेठ, नवीन व जुनी मंगळवारी, मासुरकर चौक, पारडी, टिमकी, सिरसपेठ, नंदनवन, हंसापुरी आणि भानखेडा या मूर्तिकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या वस्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. कार्यशाळांमध्ये मूर्तींचे आकार पूर्ण करण्यासोबतच त्यांना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू आहे.
पावसाच्या विश्रांतीमुळे कामे तुलनेने सुरळीत सुरू
नागपूरकर दमट वातावरण आणि उकाड्याने त्रस्त असले तरी सध्याचे कोरडे हवामान मूर्तिकारांसाठी फायदेशीर ठरत आहे. मूर्ती लवकर वाळत असल्याने पुढील रंगकाम आणि सजावटीची कामे वेळेत पूर्ण करण्यास मदत होत आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पडणाऱ्या पावसामुळे मूर्ती वाळवण्यासाठी हेअर ड्रायरसह विविध उपाय करावे लागतात. त्यामुळे मूर्तिकारांची मोठी तारांबळ उडते. यंदा मात्र पावसाच्या विश्रांतीमुळे कामे तुलनेने सुरळीत सुरू आहेत.
Nashik News: धरणीकंपामुळे घरांच्या थरारल्या विटा;नागरिकांत भितीचे वातावरण
गणपतीचे आगमण काही दिवसांवर
नागपूरात पावसाने घेतलेल्या विश्रांतीनेमूर्तिकार चांगलेच खुश झाले आहेत. गणपतीचे आगमण काही दिवसांवर आलेले असताना गणेशमूर्तिची काम ही अंतिम टप्प्यात आलेली आहेत. मात्र गणेश मूर्तींना रंग देण्या अगोदर त्या मूर्ती वाळल्या पाहिजेत. त्यासाठी बाहेरच वातावरण खुप पूरक ठरत.पावसाच्या वातावरणामुळे मूर्तिकारांना मूर्ति वाळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. परंतू सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मूर्तिकारांनी सुटकेचा श्वास सोडला.

