MTF म्हणजे काय?
Marging Trading Facility (MTF) म्हणजे जेव्हा एखादा गुंतवणूकदार पैसे कर्ज घेऊन शेअर बाजारात गुंतवतो. या प्रकारात गुंतवणूकदाराकडे आधीच थोडेफार पैसे असतात पण जास्त शेअर्स खरेदी करण्यासाठी तो जास्तीची रक्कम बाहेरून कर्ज घेतो.
दक्षिण कोरियामध्ये घडलं तरी काय?
दक्षिण कोरियात सध्या MTF ट्रेडिंग वाढली होती. काही रिटेल गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात MTF ट्रेडिंग केली. या काळात विविध कंपन्या जसे की सॅमसंग, SK Hynix यांसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढल्याने KOPSI चा निर्देशांक अचानक वाढलेला दिसून आला. हे पाहून इतर गुतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात MTF ट्रेडिंग केले. दरम्यान, टेक क्षेत्रामध्ये अचानक विक्री वाढल्याने KOPSI चा निर्देशांक घसरला. परिणामी, ब्रोकर यांनी गुंतवणूकदारांशी संपर्क साधला आणि शेअर्समध्ये आणखीन पैसे भरण्यास सांगितले अन्यथा त्यांचे शेअर्स विकले जातील असे सांगण्यात आले. पैसे न भरल्यामुळे ब्रोकरने जबरदस्तीने शेअर्स विकले. फोर्स सेलिंगमुळे दक्षिण कोरियातील लाखो गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
Zerodha च्या सह संस्थापकांनी व्यक्त केली चिंता
Zerodha चे सहसंस्थापक नितीन कामत यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवर पोस्ट शेअर करत भारतातील गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “दक्षिण कोरियामध्ये जे घडलं ते ब्रोकर म्हणून माझ्यासाठी एक दुःस्वप्न आहे. देशामध्ये कर्ज घेऊन शेअर्स विकत घेणे ( MTF Trading ) वाढत चालले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. दक्षिण कोरियात जास्त Leverage झाल्यामुळे ब्रोकर यांना Forced Selling करावी लागली होती. कदाचित अशी परिस्थिती भारतातही उदभवण्याची दाट शक्यता आहे.” एकंदरीत त्यांनी MTF Trading करणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांना MTF Trading करताना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे तसेच दक्षिण कोरियात MTF Trading मुळे झालेल्या नुकसानाविषयी चिंता व्यक्त केली आहे.
RBI चा महत्वाचा नियम; कर्ज बुडवणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘मालमत्ता एकदा हातून निसटली, तर पुन्हा मिळवता येणार नाही’
गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की पैसे कर्ज घेऊन गुंतवणूक करण्यापेक्षा स्वतःचे भांडवल उभे करा आणि शेअर बाजारात झेप घ्या.

