Headlines

RBI Loan Default Rules ; RBI चा महत्वाचा नियम; कर्ज बुडवणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, ‘मालमत्ता एकदा हातून निसटली, तर पुन्हा मिळवता येणार नाही’


RBI चा हा महत्वाचा नियम तुम्हाला माहिती आहे का? आता कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला कर्ज बुडवणे फारच महागात पडणार आहे. बँकेचे कर्ज बुडवणे आणि जप्त करण्यात आलेली मालमत्ता इतर कुणाला विकणे या दोन्ही गोष्टींमध्ये RBI आता अधिक कठोर झालेली दिसत आहे. त्यामुळे कर्जदारांना आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे.

RBI Loan Default Rules
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
देशातील बँकिंग क्षेत्रासंबंधित नवीन धोरण बनवण्याचे अधिकार RBI ला आहे. Reserve Bank of India ने बँकिंग क्षेत्रासंबंधित नवीन निर्णय जाहीर केला होता. हा नियम बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेसंबंधित आहे. एखादी मालमत्ता बँकेकडे वर्षोनुवर्षे पडून राहू नये तसेच या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून RBI ने महत्वाचे नियम आणले आहेत. हे नियम कर्ज बुडवणाऱ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण RBI च्या नव्या नियमांमुळे कर्ज बुडवणे या विषयासंबंधित धोरणे आणखीन कठोर झाले आहेत.

RBI चे ‘ते’ महत्वाचे नियम आहेत तरी कोणते?

  • जर बँकेने एखादी मालमत्ता जप्त केली असेल, तर बँकेला ती फक्त 7 वर्षांसाठीच ठेवता येईल. त्यानंतर ती मालमत्ता विकावी लागेल.
  • बँकेने मालमत्ता विकण्यासाठी काढली तर घेण्यात येणारा लिलाव हा फक्त सार्वजनिक स्वरूपाचा असावा. एकंदरीत, जप्त मालमत्ता विकण्यासाठी बँकेला पब्लिक ऑक्शन करावे लागणार आहे.
  • कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला त्याची मालमत्ता पूर्णपणे विसरावी लागणार आहे कारण त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना ही मालमत्ता पुन्हा खरेदी करता येणार नाही.
  • बँकांना जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन किमान दोन स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांकडून करणे बंधनकारक आहे.

Maharashtra Timesमहागाईचा बॉम्ब फुटणार! सर्वसामान्यांच्या खिशाला युद्धाची झळ; सणासुदीच्या तोंडावर रोजच्या वापरातील वस्तू महागणार, पाहा यादीजगभरात अनेक लोकं आर्थिक गरजेसाठी बँकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना त्यांच्या मालकीच्या काही गोष्टी बँकांकडे गहाण ठेवली जातात. त्या गोष्टी जमीन, दुकान, घर, गाडी किंवा इतर कोणतीही मालमत्ता असू शकते. कर्ज बँकांना परत करण्याची एक ठराविक मुदत दिली जाते. जर कर्ज घेणारा या वेळेत कर्ज परत करण्यात असमर्थ ठरला. तर त्याने गहाण ठेवलेली मालमत्ता पूर्णपणे बँकेच्या मालकीची होते आणि त्या मालमत्तेला विकण्याचा पूर्ण अधिकार संबंधित बँकेकडे असतो.

RBI च्या नव्या नियमावलीनुसार, बँकेकडून जप्त करण्यात आलेली ती मालमत्ता बँकेला 7 वर्षांच्या आत विकावी लागेल. जप्त करण्यात आलेली मालमत्ता पुन्हा कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला विकली जाऊ शकत नाही. तसेच त्या व्यक्ती संबंधित असणाऱ्या लोकांनाही मालमत्ता विकण्यास मनाई आहे. या गोष्टींची खबरदारी बँकांना घ्यावी लागणार आहे. बँक जप्त करण्यात आलेली मालमत्ता खाजगी लिलावाद्वारे विकू शकत नाही. जप्त मालमत्ता फक्त पब्लिक ऑक्शनद्वारेच विकली गेली पाहिजे. RBI च्या या नव्या नियमांमुळे जप्त मालमत्ता विकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे. तसेच कर्जवसुली करण्याची प्रक्रिया आणखीन शिस्तबद्ध झाली आहे.

RBI च्या या नियमांचा सामान्य माणसांवर परिणाम काय?

RBI च्या या नियमांमुळे सामान्य माणसांवर होणार परिणाम असा आहे की जर एखाद्या व्यक्तीचे कर्ज थकले तर निश्चितच मालमत्ता जप्त केली जाईल पण त्या मालमत्तेची विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शकतेने होईल. पण, कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला ती मालमत्ता पुन्हा विकत घेण्याची संधी मिळणार नाही.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा