Headlines

कंपनी PF कापते पण पासबुकवर दिसतो का? घरबसल्या 5 मिनिटात करा चेक। Maharashtra Times


दरमहा तुमच्या PF पगारातून PF चे पैसे कापले जातात, पण ते खरोखरच खात्यात जमा होत आहेत का? अनेकदा कंपन्या सॅलरी स्लिपवर PF कपात दाखवतात, मात्र ते पैसे सरकारच्या फंडात जमा करत नाहीत. अशी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही कुठेही न जाता अवघ्या 5 मिनिटांत तुमचे PF पासबुक ऑनलाइन तपासू शकता. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.

PF Balance। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुमच्या भविष्य सुरक्षिततेसाठी PF पासबुक नियमित तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कंपनीने कापलेली रक्कम EPFO खात्यात जमा झाली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टल, उमंग ॲप आणि मिस्ड कॉल सारख्या सोप्या सुविधा दिल्या आहेत. PF मधील अफरातफर रोखण्यासाठी घरबसल्या बॅलेन्स तपासण्याची ही सोपी पद्धत नक्की जाणून घ्या.

घरबसल्या PF पासबुक तपासण्याच्या 4 सोप्या पद्धती

तुम्ही खालील अधिकृत पर्यायांचा वापर करून अवघ्या काही मिनिटांत तुमच्या खात्याची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.

1. EPFO पोर्टलद्वारे PF तपासा

  • सर्वप्रथम EPFO Member Passbook Portal या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर), पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
  • लॉग इन झाल्यावर ‘Passbook’ या पर्यायावर क्लिक करा आणि तुमची Member ID निवडा.
  • येथे तुम्हाला महिनानिहाय तुमच्या पगारातून कापलेला हिस्सा (Employee Contribution) आणि कंपनीने जमा केलेला हिस्सा (Employer Contribution) स्पष्ट दिसेल.

2. उमंग ॲपद्वारे PF तपासा

  • तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून सरकारी UMANG App डाउनलोड करा.
  • ॲप उघडून ‘EPFO’ सेवा शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • ‘View Passbook’ पर्याय निवडून तुमचा UAN नंबर टाका.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्ही तुमचे संपूर्ण डिजिटल पासबुक पाहू आणि डाउनलोड करू शकता. (REF.)

3. फक्त एक मिस्ड कॉल देऊन PF तपासा

  • जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल, तर तुम्ही तुमच्या ईपीएफओकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकता.
  • कॉल केल्यानंतर दोन रिंग होऊन तो आपोआप कट होईल आणि काही सेकंदांतच तुम्हाला एसएमएस (SMS) द्वारे तुमच्या खात्यातील एकूण शिल्लक रकमेची माहिती मिळेल.

4. SMS पाठवून PF तपासा

  • मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन EPFOHO UAN MAR (मराठी भाषेसाठी) असे टाईप करा.
  • हा मेसेज 7738299899 या क्रमांकावर पाठवा.
  • उत्तरादाखल येणाऱ्या मेसेजमध्ये तुमच्या खात्यात शेवटचे पैसे कधी आणि किती जमा झाले, याची संपूर्ण माहिती दिली जाईल.

पैसे जमा न झाल्यास काय करावे?

कंपनीने पगारातून पीएफ कापला असूनही पासबुकमध्ये तो दिसत नसेल, तर सर्वप्रथम कंपनीच्या HR किंवा फायनान्स विभागाशी संपर्क साधा. काही तांत्रिक कारणांमुळे किंवा ECR लेजर पोस्टिंग अपडेट्समुळे पासबुकमध्ये रक्कम दिसण्यास काही दिवसांचा उशीर होऊ शकतो. तरीही तोडगा न निघाल्यास तुम्ही EPFO Grievance Portal वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. (REF.)

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा