House Puzzle: A, B, C आणि D अशी चार घरं तुमच्यासमोर आहेत. या घरांचं नीट बारकाईने निरीक्षण करा आणि कोणत्या घरामध्ये सर्वाधिक पैसे ठेवले आहेत, ते शोधून सांगा.

काय असेल उत्तर बरं?
A घरासमोर स्कूटी आहे आणि दिसायलाही हे घर ठीकठाक वाटत आहे. B घरासमोर कार पार्क केली आहे. शिवाय गच्चीवर सोलर पॅनल लावले आहेत. C हे घर तुलनेने थोडं साधं दिसत आहे. तर D हे घर नसून जणू बंगलाच असल्याचं दिसत आहे. पाहताच क्षणी या घरात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा असल्याचं जाणवतं.
ही चारही घरं नीट पाहा आणि या कोड्याचं उत्तर द्या.
०
०
०
०
०
बराच वेळ विचार करूनही तुम्हाला या कोड्याचं उत्तर देता आलं नाही का? तर मग निराश होऊ नका. खाली दिलेलं चित्र पाहा. त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर सापडेल.
योग्य उत्तर आहे – C
चारही पर्याय पाहिल्यानंतर पहिल्या नजरेत C हे घर सर्वात साधं वाटतं. पण याच घरात एक महत्त्वाचा क्लू लपलेला आहे. जर तुम्ही या घराचं बारकाईने निरीक्षण केलं, तर मुख्य दरवाजावर दोन CCTV कॅमेरे दिसतील.
आता प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचा – ‘कोणत्या घरामध्ये सर्वाधिक पैसे आहेत?’ प्रश्नात ‘कोणतं घर सर्वात श्रीमंत दिसतं?’ असं विचारलेलं नाही. वरकरणी C घर साधं दिसत असलं, तरी त्यावर इतर घरांच्या तुलनेत अधिक सुरक्षा व्यवस्था आहे. सामान्यतः मौल्यवान वस्तू, रोख रक्कम किंवा महत्त्वाच्या वस्तूंचं संरक्षण करण्यासाठीच लोक CCTV कॅमेरे लावतात. त्यामुळे या कोड्यानुसार C हेच योग्य उत्तर मानलं आहे.
असो, या कोड्याचं उत्तर तुम्ही काही वेगळं काढलं आहे का? असेल तर त्यामागचं कारण काय? आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
(फोटो सौजन्य – puzzlesbyfarhan/Instagram)

