ME-Card हे सूक्ष्म उद्योगांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरवण्यात येणारे क्रेडिट कार्ड आहे. या क्रेडिट कार्डमध्ये 5 लाख रक्कमेची तरतूद आहे. परंतु, या क्रेडिट रक्कमेचा लाभ प्रत्येक सूक्ष्म व्यावसायिकाला घेता येईलच असे नाही. क्रेडिट द्यायचा किती? याचा निर्णय संबंधित बँका किंवा क्रेडिट पूर्वणाऱ्य संस्था घेतात.
डिजिटल स्वरूपात अर्ज करण्याची सोय
ME-Card मिळवण्यासाठी सगळ्यात अगोदर संबंधित सूक्ष्म व्यवसाय उद्यम पोर्टलवर रजिस्टर हवा. विशेष म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया शिथिल करण्यात आली आहे. अर्ज करताना अर्ज करणाऱ्या सूक्ष्म व्यावसायिकांकडून जास्त कागदपत्रांची मागणी कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रक्रिया जलद करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मुळात, ME-Card साठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत यूपीआई, कॉमन डिजिटल अॅप्लिकेशन फॉर्म अशा डिजिटल सुविधांचा वापर केला जात आहे.
ME-Card कसे कार्य करते?
व्यवसायाची क्रेडिट लिमिट बँकांकडून किंवा संबंधित कर्ज पूरवणाऱ्या संस्थेकडून ठरवण्यात येईल. ME-Card क्रेडिट कार्डप्रमाणेच कार्य करते. एकंदरीत, क्रेडिट पुरवणाऱ्या एखाद्या बँकेने ठरविक रक्कमेचे ME-Card मंजूर केले. संबंधित सूक्ष्म व्यवसायाने त्यातील किंचित रक्कम क्रेडिट म्हणून वापरली. जेव्हा तो व्यवसाय क्रेडिट घेतलेल्या रक्कमेची व्याजासह भरपाई करेल तेव्हा कार्डमध्ये आधीची रक्कम पुन्हा उपलब्ध होईल.
ME-Card किती दराने व्याज आकरण्यात येतो?
क्रेडिटवर आकरण्यात येणारा व्याजदर हा बँकांच्या धोरणांवर आधारित असेल. वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळे दर असण्याची शक्यता आहे. परंतु, या कार्डसाठी वार्षिक शुल्क 1000 रुपयांपेक्षा कमी असेल. सूक्ष्म व्यावसायिकांच्या क्रेडिट लिमिटचा 1 टक्का जर 1000 रुपयांपेक्षा कमी असेल तर ती रक्कम त्या वर्षाचा शुल्क ठरेल.
GST Council ची बैठक होणार, पुन्हा घेणार मोठे निर्णय; मोबाइल जीएसटी, रजिस्ट्रेशनसह अनेक मुद्द्यांवर लक्षसूक्ष्म व्यावसायिकांना ME-Card चा वापर दररोजचे व्यावसायिक खर्च भागवण्यासाठी तसेच कच्चा माल खरेदी करणे अशा व्यवहारांसाठी करता येतो. सूक्ष्म व्यावसायिकांची व्यवसायासंबंधित असणारी तात्पुरती गरज भागवण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती.

