Koyna Water Crisis: उद्योग बंद राहिल्याने याचा परिणाम हजारो कामगार, कंत्राटी कर्मचारी आणि उद्योगाशी संबंधित व्यवसायांवर होत आहे.

घरडा केमिकल कंपनीला सर्व प्रकल्प बंद ठेवावे लागले आहेत. कोकणातच नव्हे तर कोयना धरण क्षेत्रातही पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका आता पिण्याच्या पाण्याबरोबरच आता थेट औद्योगिक क्षेत्रालाही बसतो आहे. खेड लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा जवळपास बंद झाल्याने झाल्याने अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवणे अशक्य बनले आहे.
Raigad News : सह्याद्रीच्या कुशीत दडलेला इतिहास उजेडात; 600 फूट खोल दरीतून बाहेर आल्या स्वराज्याच्या तोफा
एमआयडीसीतील इतर अनेक मोठ्या आणि मध्यम उद्योगांकडेही पाण्याचा साठा अत्यल्प प्रमाणात शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस सुरू झाला नाही, तर उर्वरित कंपन्यांनाही उत्पादन बंद करण्याची वेळ येईल, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.
पाणीसंकट का गहिरे ?
– कोयना धरणाच्या चार टप्प्यांमधून एकूण १९६० मेगावॉट वीज निर्मिती केली जाते.
– हे चारही टप्पे बंद असून केवळ मूळ टप्पा सुरू असून, त्यामधून सांगलीला पिण्याचे पाणी सोडले जाते.
– सर्वांत खालच्या टप्प्यातून २० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू असून, वीजपुरवठ्याचे संकट ओढवले आहे.
– कोयना धरणातील पाणीपातळी आटल्याने त्याचा परिणाम चिपळूणमधील वाशिष्ठी नदीवर झाला आहे.
– त्यामुळे प्राधान्य पिण्याच्या पाण्याला द्यावे लागत आहे.
Eknath Shinde: ट्रिपल संजय अन् षटकार! ठाकरेंचे 6 फुटीर खासदार शिंदेसेनेत; भाईंकडून आणखी धमाक्यांचे संकेत
लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक, औषधनिर्माण, रंगनिर्मिती आदी उत्पादन क्षेत्रातील शेकडो उद्योग आहेत. पाणी हा मुख्य स्रोतच बंद झाल्यामुळे पाण्याअभावी कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. – प्रशांत पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स

