Headlines

Bollywood Movies Release 2026


Bollywood Movies Release 2026:येत्या काही दिवसांत बॉलिवूड तसंच हॉलिवूडचे वेगवेगळे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण या सगळ्यात बॉक्स ऑफिसवर धुरंधर कोण ठरणार याकडं आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

Upcoming Movies Release:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई टाइम्स टीम

यंदा ‘ धुरंधर २ ‘च्या विक्रमी कमाईनं २०२६च्या बॉक्स ऑफिसला नवा मापदंड मिळाला आहे. आता वर्षाच्या उत्तरार्धात अनेक बिग बजेट आणि बहुप्रतीक्षित चित्रपट मैदानात उतरू लागले आहेत. ‘टॉक्सिक’, ‘दृश्यम ३’, ‘रामायण’, ‘किंग’पासून हॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांवर नजर आहे. त्यामुळे यंदाचा पुढचा बॉक्स ऑफिस धुरंधर कोण ठरणार? याकडे सिनेसृष्टीचं लक्ष लागलंय.

पहिल्या सहामाहीत बॉक्स ऑफिसवर तब्बल दोन हजार १४०० कोटी रुपयांची विक्रमी कमाई झाली. यामध्ये एकट्या ‘धुरंधर २’नं एक हजार १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचबरोबर ‘बॉर्डर २‘नंही ३०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. या कालावधीत ‘भूत बंगला’ आणि ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटांनीही १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जुलै महिन्यात हॉलिवूडच्या ‘ओडिसी’ आणि ‘स्पायडर-मॅनः ब्रँड न्यू डे‘ हे सिनेमेही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत. ‘धमाल ४’ नंसुद्धा समाधानकारक व्यवसाय केला. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष आगामी चित्रपटांकडे लागलं असून, वर्षातील बॉक्स ऑफिसचा पुढचा ‘धुरंधर’ कोण ठरणार, याची उत्सुकता आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठी कसोटी

वर्षाच्या अखेरच्या दोन महिन्यांत बॉक्स ऑफिसवर काही महत्त्वाचे आणि मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर रणबीर कपूर आणि यश अभिनित ‘रामायण’चा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. मेगा बजेट असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती मोठा गल्ला जमवतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. श्रद्धा कपूर अभिनित आणि लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा‘ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. त्यानंतर नाताळला शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘किंग’ येणार आहे. गेली तीन वर्षं मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या शाहरुखला पुन्हा सिनेमागृहात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॉक्सिक’ पासून ‘दृश्यम ३’पर्यंत…

येत्या काही महिन्यांत अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये सर्वांत आधी सनी देओलचा ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. तसंच इम्रान हाश्मीचा ‘आवारामन २’ सुद्धा प्रदर्शित होतोय.

Maharashtra TimesKangana Ranaut: ‘फाळणीला इतकी वर्षे उलटूनही त्याचं पाकिस्तान प्रेम काही संपत नाहीये’, कंगना रणौतची नसीरुद्दीन शाह यांच्यावर पुन्हा घणाघाती टीका

बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ होणार प्रदर्शित

त्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक’ प्रदर्शित होणार आहे. दोन वेळा प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अजय देवगणच्या गाजलेल्या ‘दृश्यम’ फ्रेंचायझीचा तिसरा भाग ‘दृश्यम ३’ पडद्यावर येतोय. ‘यावर्षी ‘धुरंधर २’ आणि ‘बॉर्डर २’ वगळता अन्य कोणत्याही चित्रपटानं बंपर कमाई केलेली नाही. ‘बटवारा १९४७’, ‘टॉक्सिक’ आणि ‘दृश्यम ३’ यांसारख्या चित्रपटांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. याशिवाय ‘रामायण’ आणि ‘किंग’ या चित्रपटांकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत’, असं निर्माते आणि चित्रपट व्यवसाय विश्लेषक गिरीश जौहर सांगतात. तसंच येत्या काही महिन्यांत बहुचर्चित ‘मिर्झापूर’, राजकुमार राव अभिनित ‘प्रहार’, अक्षय कुमारचा ‘हैवान’, मेघना गुलजारचा ‘दायरा’ हे सिनेमेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Maharashtra TimesBatwara 1947 vs Awarapan 2: ॲडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत इम्रान हाश्मीने सनी देओलला टाकलं मागे, ‘आवारापन २’च्या इतक्या तिकीटांची विक्री
हॉलिवूडच्या पडद्यावर !

बॉलिवूडसोबतच डिसेंबरमध्ये हॉलिवूडचेही काही बहुप्रतीक्षित चित्रपट COM प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये ‘जुमांजी ओपन वर्ल्ड’, ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ आणि ‘ड्यून ३’ या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करत ‘धुरंधर’ची जागा घेतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.