3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

आज जगात एका वेगळ्या प्रकारची आर्थिक दरी दिसूनयेते. लोक दुहेरी आर्थिक परिस्थितीचा सामना करतआहेत. भारताचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास इथेतरुणांमधील बेरोजगारीचा दर उच्च आहे. महाविद्यालयेव विद्यापीठांमधून बाहेर पडणाऱ्या तरुणांसाठीनोकऱ्यांची मोठी टंचाई आहे. तरुणांमधीलबेरोजगारीचा दर 2025 मध्ये 2.1 टक्क्यांनी वाढून 17.7टक्के झाला. परिणामी, अनेक तरुण व त्यांच्या कुटुंबांचेवास्तविक उत्पन्न घटले. दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थावेगाने वाढत आहे. 2025 मध्ये दरडोई जीडीपीमध्ये 6.6टक्क्यांची वाढ झाली. पण हे आकडे वास्तव लपवतात.कारण लोकसंख्येच्या एका लहान घटकाच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली.बहुसंख्य जनता आर्थिक संकटाशीझुंजत आहे.
इतकी मोठी आर्थिक दरी कायम राहणे हे धोरणात्मक अपयश आहे. भारत हा मध्यम उत्पन्नाचा देश आहे.योग्य धोरणांच्या जोरावर भारत आपल्या तरुणांसाठीपुरेशा नोकऱ्या निर्माण करू शकतो. श्रम बाजारातील सध्याचे प्रवाह एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानानेप्रभावित झालेले असतानाही हे शक्य आहे. हे तंत्रज्ञान मानवी श्रमाची गरज कमी करते आणि नफा काहीमोजक्या हातांत केंद्रित करते.
अस्वस्थता आणि आर्थिक दरी वाढत आहे, तसेधोरणकर्ते व विश्लेषकांनी एकूण आकडेवारीमागीलवास्तव समजून घेतले पाहिजे. आपण बहुधा विशिष्टकाळात प्रवेश करत आहोत. त्याला ‘गेटेड रिसेशन”(मर्यादित मंदी) म्हणता येईल. ही स्थिती म्हणजे काहीसमाजघटक किंवा क्षेत्रे मंदीचा सामना करतात; तरश्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होत जातो. यामुळे एकूणआर्थिक आकडेवारी उत्तम दिसते.
उदाहरणाच सांगायचे तर, भारतातीलनिम्न-मध्यमवर्गीय कुटुंबे—विशेषतः त्यांची मुलेनुकतीच कॉलेजमधून बाहेर पडली आहेत—ती अशा‘गेटेड रिसेशन”मध्ये अडकली आहेत. अमेरिकेतहीमिसिसिपी, न्यू मेक्सिको, लुईझियाना व ओक्लाहोमायांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या राज्यांत हीच मंदीअनुभवायला मिळत आहे. हा मुद्दा केवळ एका पक्षावरकिंवा सरकारवर दोषारोप करण्याचा नाही. कारण याविषमतेची कारणे अत्यंत खोल व गुंतागुंतीची असतात.तरीही या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरूनराजकीय नेत्यांना उत्तरदायी धरले पाहिजे. केवळकागदी आकडे दाखवून ही समस्या नाकारता येणारनाही. ही दरी मिटवण्यासाठी बहुआयामी धोरणांची गरजआहे. एआयचा वापर जसा वाढेल तशी विषमतेची दरीआणखी रुंदावेल.
नोकऱ्या वाचवण्यासाठी एआयचा वापर रोखणे अधिकनुकसानकारक ठरेल. यामुळे आर्थिक संकट वाढेलआणि उत्पादकतेवरही वाईट परिणाम होईल. ‘गेटेडसमृद्धी” आणि ‘गेटेड गरिबी” यांच्यातील भिंतीपाडण्यासाठी अतिश्रीमंतांच्या मालमत्तेवर,वारसाहक्कावर व उत्पन्नावर जास्त कर लावणे हाअधिक प्रभावी मार्ग ठरू शकतो.
अमेरिकेतून येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष द्या. ‘ब्युरो ऑफलेबर स्टॅटिस्टिक्स”च्या ताज्या आकड्यांनुसार जुलैमध्येअमेरिकन अर्थव्यवस्थेतील 23 हजार नोकऱ्या कमीझाल्या, तरीही तेथील बेरोजगारीचा दर घटला. याविरोधाभासाचे कारण असे की, अमेरिकेत केवळसक्रियपणे नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीलाच ‘बेरोजगार”मानले जाते. पण आज बाजारातील स्थिती इतकीनिराशाजनक आहे की, लोकांनी नोकरी शोधणेचसोडून दिले आहे. एका अंदाजानुसार, नोव्हेंबर 2025पासून आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोक अमेरिकनकार्यबलातून बाहेर पडले आहेत.
ही आर्थिक दरी थक्क करणारी आहे. एकीकडेकामगारांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे उत्पन्नशेअर बाजार आणि कॉर्पोरेट नफ्यावर अवलंबून आहे.त्यांच्यासाठी तेजीचा काळ आहे. नोकऱ्या जाण्याच्यावाईट बातम्या येत असतानाही अमेरिकन शेअरबाजारात मात्र तेजी दिसून येत आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)

‘गेटेड रिसेशन” म्हटल्या जाणाऱ्याकाळात आपण प्रवेश करत आहोत. अशास्थितीत काही घटक मंदीतून जातात, तरश्रीमंत अधिक श्रीमंत होत राहतात.त्यामुळे एकूण आर्थिक आकडे मात्रउत्तम दिसतात.

