Headlines

Kangana Ranaut On Sharmila Tagore Vande Mataram Opinion ; Kangana Ranaut On Sharmila Tagore :वंदे मातरम् च्या पहिल्या दोनच ओळी ठीक! शर्मिला टागोर यांच्या मतावर कंगना रणौतचा निशाणा; हिंदू-मुस्लिम विचारांतून बाहेर पडण्याचा सल्ला


Vande Bharat Controversy : वंदे मातरम् वरुन चालेल्या वादावर अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचे मत व्यक्त करताच कंगना रणौतने त्यांच्यावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले आहे.

sharmila tagore kangna ranaut
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिनेत्री खासदार असलेली कंगना रणौत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिला न पटलेल्या मुद्दांवर ती सडेतोड भाष्य करते. यासाठी तिला बरेचदा टीकेचा सामना करावा लागत असला तरी तिला फरक पडत नाही. काही दिवसांपूर्वी ती जेन-झी वादामुळे चर्चेत होती तर आता ती वंदे मातारमवरुन चालेल्या वादामुळे चर्चेत आहे.

त्यचे झाले असे की, बॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अलीकडेच ‘वंदे मातरम‘बाबत सुरू असलेल्या वादावर आपली मते मांडली. त्यांनी म्हटले की, ‘वंदे मातरम’ची केवळ पहिली दोन कडवीच योग्य आहेत; कारण उर्वरित गाण्यातील ओळी या एकाच देवावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी कठीण आहेत. यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे; तिने शर्मिला टागोर यांच्या विधानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. अभिनेत्रीने त्यांना ‘हिंदू-मुस्लिम मानसिकते’च्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा सल्ला दिला.

सध्या ‘वंदे मातरम’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील हा वाद 15 ऑगस्ट रोजी पासून सुरू झाला. काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम’ हे संपूर्ण गीत गाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने केला होता. शर्मिला टागोर यांनी या वादावर त्यांचे मत व्यक्त केल्यानंतर त्यावर कंगना रणौतने प्रत्युत्तर दिले.

Maharashtra TimesAditi Sarangdhar On Neelam Shirke : माझं आणि नीलम शिर्केचं भांडण होतं, वादळवाटच्या अवॉर्डनंतर काय घडलेलं? अदिती सारंगधरनं सांगितला कोल्ड वॉरचा किस्सा
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शर्मिला टागोर यांचा ‘वंदे मातरम’बद्दल बोलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “शर्मिला-जी यांनी ‘वंदे मातरम’बाबत आपली आक्षेपार्ह मते मांडली आहेत, याचे मला कौतुक वाटते; परंतु एक कलाकार म्हणून, कला किंवा कवितेबाबतचा त्यांचा दृष्टिकोन इतका मर्यादित आणि कृत्रिम कसा काय असू शकतो, याचे मला आश्चर्य वाटते.”

‘वंदे मातरम’मध्ये स्वातंत्र्यलढ्याची भावना सामावलेली आहे

कंगनाने पुढे स्पष्ट केले की, कोणत्याही कविता किंवा गाण्यातील शब्द हे रूपके असतात आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी कवी विविध प्रकारच्या कल्पनांचा वापर करतात. ‘वंदे मातरम’बाबत आपले विचार मांडताना कंगना म्हणाली, ‘वंदे मातरम’मध्ये स्वातंत्र्यलढ्याची भावना सामावलेली आहे. बंकिमचंद्र देशाला आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी प्रेरित करत होते. स्वामी विवेकानंद यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, त्यांना असे तरुण हवे आहेत ज्यांचे शरीर लोखंडासारखे आणि हाडे पोलादासारखी असतील, तसेच ज्यांच्या नसानसांत विजेसारखी प्रचंड ऊर्जा असेल. ते काही हवामानाचा अहवाल देत नव्हते; तर त्याऐवजी, ते पुढे वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामर्थ्याचे आवाहन करत होते.”

कंगना रणौत पोस्ट <br>

‘हिंदू-मुस्लिम मानसिकतेच्या पलीकडे जा’

त्यानंतर कंगना रणौतने शर्मिला टागोर यांना उद्देशून लिहिले, “कृपया हिंदू-मुस्लिम मानसिकतेच्या पलीकडे जा; आपण एकाच देवावर श्रद्धा ठेवतो. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आपण नेहमी जेव्हा भेटतो तेव्हा जशी घट्ट मिठी मारतो तशी परत मारायला मला नक्की आवडेल.”

Maharashtra TimesNakul Ghanekar Choreograph Manushi Chhillar : मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड होण्यात ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याचा मोलाचा वाटा, देशासाठी अभिमानाचं काम

‘वंदे मातरम’बद्दल शर्मिला टागोर काय म्हणाल्या:

‘वंदे मातरम’वरून सुरू असलेल्या वादाबाबत ‘आयएएनएस’शी बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या, “माझ्या मते, असे अनेक धार्मिक लोक आहेत ज्यांचा अनेक देवतांऐवजी एकाच देवावर विश्वास आहे. ‘वंदे मातरम’मध्ये अशा काही ओळी आहेत ज्यात अनेक देवतांचा उल्लेख येतो. ज्यांची श्रद्धा एकाच देवावर आहे, अशा लोकांसाठी ‘वंदे काली, वंदे दुर्गा’ असे म्हणणे कठीण असते. त्यामुळे, जर आपल्याला भारतातील सर्व धार्मिक लोकांना सोबत घेऊन जायचे असेल, तर या गीताच्या पहिल्या दोन ओळी अतिशय उत्तम आहेत.”

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा