Vande Bharat Controversy : वंदे मातरम् वरुन चालेल्या वादावर अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचे मत व्यक्त करताच कंगना रणौतने त्यांच्यावर निशाणा साधत प्रत्युत्तर दिले आहे.

त्यचे झाले असे की, बॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अलीकडेच ‘वंदे मातरम‘बाबत सुरू असलेल्या वादावर आपली मते मांडली. त्यांनी म्हटले की, ‘वंदे मातरम’ची केवळ पहिली दोन कडवीच योग्य आहेत; कारण उर्वरित गाण्यातील ओळी या एकाच देवावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी कठीण आहेत. यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे; तिने शर्मिला टागोर यांच्या विधानाबद्दल आश्चर्य व्यक्त केले. अभिनेत्रीने त्यांना ‘हिंदू-मुस्लिम मानसिकते’च्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा सल्ला दिला.
सध्या ‘वंदे मातरम’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यातील हा वाद 15 ऑगस्ट रोजी पासून सुरू झाला. काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम’ हे संपूर्ण गीत गाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपने केला होता. शर्मिला टागोर यांनी या वादावर त्यांचे मत व्यक्त केल्यानंतर त्यावर कंगना रणौतने प्रत्युत्तर दिले.
Aditi Sarangdhar On Neelam Shirke : माझं आणि नीलम शिर्केचं भांडण होतं, वादळवाटच्या अवॉर्डनंतर काय घडलेलं? अदिती सारंगधरनं सांगितला कोल्ड वॉरचा किस्सा
कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शर्मिला टागोर यांचा ‘वंदे मातरम’बद्दल बोलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “शर्मिला-जी यांनी ‘वंदे मातरम’बाबत आपली आक्षेपार्ह मते मांडली आहेत, याचे मला कौतुक वाटते; परंतु एक कलाकार म्हणून, कला किंवा कवितेबाबतचा त्यांचा दृष्टिकोन इतका मर्यादित आणि कृत्रिम कसा काय असू शकतो, याचे मला आश्चर्य वाटते.”
‘वंदे मातरम’मध्ये स्वातंत्र्यलढ्याची भावना सामावलेली आहे
कंगनाने पुढे स्पष्ट केले की, कोणत्याही कविता किंवा गाण्यातील शब्द हे रूपके असतात आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी कवी विविध प्रकारच्या कल्पनांचा वापर करतात. ‘वंदे मातरम’बाबत आपले विचार मांडताना कंगना म्हणाली, ‘वंदे मातरम’मध्ये स्वातंत्र्यलढ्याची भावना सामावलेली आहे. बंकिमचंद्र देशाला आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी प्रेरित करत होते. स्वामी विवेकानंद यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, त्यांना असे तरुण हवे आहेत ज्यांचे शरीर लोखंडासारखे आणि हाडे पोलादासारखी असतील, तसेच ज्यांच्या नसानसांत विजेसारखी प्रचंड ऊर्जा असेल. ते काही हवामानाचा अहवाल देत नव्हते; तर त्याऐवजी, ते पुढे वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सामर्थ्याचे आवाहन करत होते.”
‘हिंदू-मुस्लिम मानसिकतेच्या पलीकडे जा’
त्यानंतर कंगना रणौतने शर्मिला टागोर यांना उद्देशून लिहिले, “कृपया हिंदू-मुस्लिम मानसिकतेच्या पलीकडे जा; आपण एकाच देवावर श्रद्धा ठेवतो. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आपण नेहमी जेव्हा भेटतो तेव्हा जशी घट्ट मिठी मारतो तशी परत मारायला मला नक्की आवडेल.”
‘वंदे मातरम’बद्दल शर्मिला टागोर काय म्हणाल्या:
‘वंदे मातरम’वरून सुरू असलेल्या वादाबाबत ‘आयएएनएस’शी बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या, “माझ्या मते, असे अनेक धार्मिक लोक आहेत ज्यांचा अनेक देवतांऐवजी एकाच देवावर विश्वास आहे. ‘वंदे मातरम’मध्ये अशा काही ओळी आहेत ज्यात अनेक देवतांचा उल्लेख येतो. ज्यांची श्रद्धा एकाच देवावर आहे, अशा लोकांसाठी ‘वंदे काली, वंदे दुर्गा’ असे म्हणणे कठीण असते. त्यामुळे, जर आपल्याला भारतातील सर्व धार्मिक लोकांना सोबत घेऊन जायचे असेल, तर या गीताच्या पहिल्या दोन ओळी अतिशय उत्तम आहेत.”

