Jalna Tehsildar Attacked: झटापट्टीत महसूल सेवक सोमनाथ सरफळे आणि पपेश बुलबुले मोहितेंच्या मदतीसाठी आले आणि ते जखमी झाले.

तहसीलदार मोहिते सकाळी गोंदी येथे नदीच्या पात्रात उतरले. चार डोझरच्या साहाय्याने ओळीने उभ्या असलेल्या अनेक विनाक्रमांकाच्या हायवांमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. पथकात तीन तलाठी व दोन महसूल सेवक होते. पात्रात उतरण्याच्या चिंचोळ्या रस्त्यावर क्रुझर गाडी आडवी करून त्यांनी रस्ता बंद केला. महसूल पथक दिसताच पात्रातून मजुरांनी फोन गेले आणि काही मिनिटांतच या वाळू माफियांच्या टोळ्यांनी पथकाला घेरले. तहसीलदार मोहिते यांना धक्काबुक्की घाणेरड्या शिव्या देत ते हायवा पळवू लागले. रस्त्यावर आडव्या क्रुझर गाडीला हायवाने ढकलून तहसीलदार मोहिते यांच्या अंगावर हायवा घालण्याचा प्रयत्न झाला.
Nana Patole: महाजेनकोत 10 हजार कोटींचा घोटाळा? नाना पटोलेंचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणीमोहितेंनी पोलिसांना फोन केला. दोन काॅन्स्टेबल आणि पोलिस उपनिरीक्षक मोपडे घटनास्थळी उशिरा आले. ते येईपर्यंत माफिया वाळूने भरलेल्या पाच हायवा, चार डोझर घेऊन पळून गेले. जाताना रस्त्यात उभ्या पोलिसांच्या अंगावर त्यांनी शेवटची हायवा घातली. जीवाच्या आकांताने पोलिसांनी उड्या मारीत जीव वाचवला, अशी माहिती मोहिते यांनी दिली.
दरम्यान, गोदापात्रात रात्रंदिवस खूप मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन चालू आहे. या परिसरात गेल्या काही वर्षांत तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार यांच्यासह तहसीलदारांच्या महसूल पथकावर अनेकवेळा प्राणघातक हल्ले केले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी सकाळी सातला मोहिते यांच्यावर हल्ला झाल्यानंतर, बारा तास उलटून गेल्यानंतरही रात्री आठपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
Crime News : शोरुमसमोर उभे राहिले, पोलिसांना संशय, झडती घेतल्यावर पुड्या सापडल्या, तस्करांच्या तिथेच मुसक्या आवळल्यादरम्यान, हल्ला करणाऱ्या २१ जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यात गोपीनाथ सातपुते, गणेश सावंत, मनोज राऊत, स्वप्नील पवार, संतोष कांबळे, रविकिरण खराद, विकास खराद, अक्षय बानाईत, सुरेश चाळगे, शामसुंदर खराद, भगवत पवार, लखन परदेशी, अतुल म्हस्के, रामभाऊचंद परदेशी, किशोर खराद, अशोक कुरलेकर, अस्मान उर्फ पप्पू नवाजी गात, अतुल सोळंके, राहुल खराद, महादू खराद, सिद्धेश्वर गात यांचा समावेश आहे.

