Headlines

30 year old pooja body found in palghar suspicion on husband police search underway; पूजा फोन उचलेना, काळजीपोटी भाऊ थेट मुंबईजवळील घरी पोहोचला, दरवाजातून भयंकर दुर्गंध


Palghar News:सदनिकेत आढळलेल्या महिलेच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह प्रकरणांचे नेमके गूढ काय? याचा तपास पालघर पोलीस करीत आहेत.

palghar news
पूजा फोन उचलेना, काळजीपोटी भाऊ थेट मुंबईजवळील घरी पोहोचला, दरवाजातून भयंकर दुर्गंध(फोटोLipi)
नमित पाटील, पालघर: तीस वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पालघर शहरातील जुना सातपाटी रोड परिसरातील एका इमारतीच्या सदनिकेत आढळला आहे. पूजा मिश्रा (वय ३०) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा मिश्रा आणि त्यांचे पती चंदन मिश्रा या दोघांचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. मिश्रा दाम्पत्य पालघर शहरातील जुना सातपाटी रोड परिसरातील घोडेला गार्डन परिसरातील फनेल या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक २०१ मध्ये येथे वास्तव्यास होते. पूजाचे भाऊ प्रदीप कुमार मिश्रा बहिणीला शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून सातत्याने फोन करत होते. मात्र पूजा यांनी फोन उचलला नाही, त्यानंतर काही वेळाने त्यांचा फोन बंद येऊ लागला. दोन दिवस सतत संपर्क करण्याचा प्रयत्न पूजाचे भाऊ प्रदीप यांनी केला. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नाही. आपल्या बहिणीसोबत नेमके काय झाले, या चिंतेत असलेले भाऊ प्रदीप सोमवारी थेट सुरत येथून बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी दाखल झाले. बहीण वास्तव्य करत असलेल्या इमारतीच्या सदनिकेबाहेर प्रदीप मिश्रा पोहोचले असता सदनिकेच्या दरवाज्याला कुलूप असल्याचे व दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. सदनिकेच्या आतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे देखील त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने 112 नंबरवर फोन करून पोलिसांशी संपर्क साधला, त्यानंतर पोलीस कर्मचारी प्रविण पाटील आणि राजेश वायझडे यांच्यासह पालघर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.

सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला असता धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. सदनिकेच्या बेडरूममध्ये पूजा मिश्रा हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक पाहणीत मृतदेहाच्या नाक व तोंडातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आल्याचे कळते. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पालघर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून मृत महिलेचा पती चंदन मिश्रा याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, पूजा मिश्राचे पती चंदन मिश्रा दारूच्या आहारी गेल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. पूजा यांना मारहाण केली जात असल्याचा आरोप पूजाचे भाऊ प्रदीप मिश्रा यांनी केला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा