Eknath shinde new strategy for strict control over ministers departments regular review meetings; एकनाथ शिंदेंकडून बैठकांचा धडाका, सगळ्या मंत्र्यांची शाळा घेणार, प्रशासकीय यंत्रणेवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न
Eknath shinde new strategy for strict control over ministers departments regular review meetings; एकनाथ शिंदेंकडून बैठकांचा धडाका, सगळ्या मंत्र्यांची शाळा घेणार, प्रशासकीय यंत्रणेवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात शिक्षण विभागाची तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शिक्षण विभागाची परीक्षा घेतली होती. शिक्षण विभागाच्या या परीक्षेनंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांच्या प्रत्येक विभागाची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. या निर्णयानुसार येत्या काळात दर आठवड्याला शिंदेकडून मंत्र्यांची आढावा बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत सर्व मंत्र्यांना त्यांचे प्रगती पुस्तक सादर करावे लागणार आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात शिंदे यांच्याकडून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध योजना, निर्णयांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रश्न आणि आगामी काळातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांचा नियमित आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. दर आठवड्याला संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या विभागातील कामांची प्रगती, सरकारच्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित निर्णय आणि आगामी कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांना आपल्या विभागाच्या कामकाजाची अद्ययावत माहिती घेऊन बैठकीला उपस्थित राहावे लागणार आहे.
प्रशासकीय यंत्रणेवरही अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न ?
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांचा नियमित आढावा घेण्याच्या निर्णयामागे केवळ मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेवरही अधिक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्र्यांच्या बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ सनदी अधिकारीही उपस्थित राहणार असल्याने विभागातील निर्णयांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रस्ताव आणि कामांना होणारा विलंब याबाबत थेट जाब विचारला जाण्याची शक्यता आहे.
मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहावा तसेच सरकारी निर्णयांची वेळेत अंमलबजावणी व्हावी, यासाठी या बैठकांचा उपयोग करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. एखादा निर्णय प्रलंबित राहिल्यास त्यामागचे कारण काय आणि तो दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याचा आढावा बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.
कामगिरीचा नियमित आढावा
शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांमधील महत्त्वाचे निर्णय आणि सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यामागे कामकाजाला गती देण्याचा उद्देश असल्याचे मानले जात आहे. केवळ बैठका घेण्याऐवजी प्रत्यक्षात किती निर्णयांची अंमलबजावणी झाली याचा आढावा या बैठकांमधून घेतला जाणार आहे. त्यामुळे
दरम्यान, शिक्षण विभागानंतर आता आरोग्य विभागाचा क्रम लागला आहे. येत्या आठवड्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विभागाची आढावा बैठक शिंदे घेणार असल्याचे समजते. आरोग्य विभागाशी संबंधित योजना, रुग्णालयांमधील सुविधा, मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता तसेच प्रलंबित निर्णय याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाच्या कामकाजाचा शिंदे कोणत्या पद्धतीने आढावा घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा