Headlines

grandfather granddaughter died in car accident ; विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कारला अपघात, आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा


सातारा-पंढरपूर मार्गावर धुळदेव (ता. माण) येथे कारला झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू झाला आहे. रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावर आतापर्यंत ३०० हून अधिक अपघात झाले असून ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

Grandfather and granddaughter died in car accident
सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना कार पलटी होऊन आजोबा आणि नात जागीच ठार झाली, तर एक गंभीर आणि तीन जण किरकोळ जखमी झाले. सातारा-पंढरपूर मार्गावर धुळदेव (ता. माण) गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. अशोक विष्णू निकम (वय ७७) आणि त्यांची नात लक्ष्मी सचिन निकम (वय १३, रा. कोडोली, ता. सातारा), अशी मृतांची नावे आहेत. आठ वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे या मार्गावर आजपर्यंत ३०० हून अधिक लहान-मोठे अपघात झाले असून २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कार चारवेळा पलटली

सातारा तालुक्यातील कोडोली गावचे निकम कुटुंबीय देवदर्शनसाठी मारुती अल्टो कारने पंढरपूरला निघाले होते. सातारा पंढरपूर मार्गावरून जात असताना माण तालुक्यातील धुळदेव गावच्या हद्दीत रस्ता उखडलेला असल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने आल्टो कारने तीन ते चार पलट्या खाल्या. त्यामुळे कार पलटी होऊन आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू झाला.

जखमींना रुग्णालयात नेलं

अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील एक गंभीर आणि तीन किरकोळ जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

Maharashtra TimesBeed Accident : कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा कार अपघात, माय-लेकाचा होरपळून मृत्यू

रखडलेल्या कामामुळे सातारा-सोलापूर मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. अनेकवेळा आंदोलने करूनही कामाला गती आलेली नाही. त्यामुळे आज झालेल्या अपघाताला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

३०० हून अधिक अपघात

या मार्गावर आतापर्यंत लहान मोठे ३०० हून अधिक अपघात झाले आहेत. त्यात जवळपास २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील बांधकाम खात्याचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष आहे. आणखी किती जणांचा जीव गेल्यावर बांधकाम खात्याला जाग येईल, असा संतप्त सवाल माण तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा