Headlines

Bullet Train Update: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण, कधी धावणार पहिली ट्रेन? – mumbai-ahmedabad bullet train project big update work of second tunnel completed


Mumbai-Ahmedabad Bullet Train: डहाणू पर्वतीय बोगदा ४५४ मीटर लांब असून, १४.४ मीटर रुंद आहे. यातून बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन मार्गिका असणार आहेत.

bullet train
bullet train(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मंगळवारी महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. पालघरमधील दुसऱ्या पर्वतीय बोगद्याचे भेदन (ब्रेकथ्रू) पूर्ण झाले आहे. यापूर्वी २ जानेवारीला पहिल्या बोगद्याचे भेदन पूर्ण झाले होते. बुलेट ट्रेन प्रकल्पात राज्यात एकूण साडेसहा किलोमीटरचे सात बोगदे आहेत. यापैकी तीन बोगद्याचे भेदन पूर्ण झाले आहे.

सद्यस्थितीत बोगद्याच्या कामात निर्णायक यश मिळवले आहे. या बोगद्याचे काम ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ या पद्धतीने (एनएटीएम) करण्यात आले. दोन्ही टोकांहून अत्याधुनिक ड्रिल आणि नियंत्रित स्फोटकांचा वापर करून १२ महिन्यांत हे खोदकाम पूर्ण झाले. आता बोगद्यातील आतील कामे सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरित बोगद्यांचे कामही विविध टप्प्यांत सुरू असून, येत्या वर्षभरात महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. देशाची पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी धावणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

Maharashtra TimesGirish Mahajan : ‘शिंदेंनी त्यांना समज द्यावी, पहिली टर्म शेवटची न ठरावी’, गिरीश महाजन प्रचंड संतापले
बुलेट ट्रेन प्रकल्प असा…
एकूण लांबी : ५०८ किमी
बोगद्यांची एकूण लांबी : २७.४ किमी
जमिनीखालील : २१ किमी
जमिनीवरील (पर्वतीय) : ६.४ किमी
पर्वतीय बोगद्यांची संख्या : ८
महाराष्ट्र : ७ ( ६.५ किमी)
गुजरात : १ ( ३५० मीटर )

तीन बोगद्यांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
पहिला बोगदा (पाच किमी)

शिळफाटा
सप्टेंबर २०२५
दुसरा बोगदा (१.४८ किमी)
विरार
२ जानेवारी २०२६
तिसरा बोगदा (४५४ मीटर)
डहाणू
३ फेब्रुवारी

Maharashtra TimesNCP Merger: शरद पवार गट एनडीएत येणार होता; विलीनीकरणाच्या चर्चेबाबत एका बड्या नेत्याची माहिती
‘टीबीएम’ची प्रतीक्षाच
‘टनेल बोरिंग मशिन’चे (टीबीएम) काही भाग अद्यापही चीनमध्ये आहेत. सर्व भाग आल्यानंतर त्याची जोडणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत ‘टीबीएम’च्या मदतीने वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणेदरम्यान बोगदा खणण्याचे काम सुरू होईल’, असे नॅशनल हायस्पीड कॉर्पोरशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra TimesMayor Salary : महापौरांना नेमका पगार किती असतो? मानधनापेक्षा भत्ते, सोयी-सुविधा अफाट
प्रकल्पातील बोगद्यांची सद्यस्थिती
बोगदा क्रमांक –लांबी –सद्यस्थिती (टक्के) –काम पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख

एमटी १ —८२० मीटर १६ –१७ एप्रिल २०२८
एमटी २ —२२८ मीटर ० –१० ऑगस्ट २०२८
एमटी ३ —४० मीटर ४१ –२९ फेब्रुवारी २०२८
एमटी ४ —१२६० मीटर ३२ –११ मे २०२८
एमटी ५ —१४८० मीटर ५७ –२० डिसेंबर २०२७
एमटी ६ —४५४ मीटर ४७ –८ मार्च २०२८
एमटी ७ —४१७ मीटर २९ –२९ जानेवारी २०२८

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा