Today’s Gold and Silver Rate 27 August 2026: सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा रंगात आले आहेत. आदल्या दिवशी (26 ऑगस्ट रोजी) अचानक झालेल्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरांनी ऐन रक्षाबंधनआधी हिरवीगार सुरुवात केली आहे. मॅक्रोइकॉनॉमिक घडामोडी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीला आधार देत असताना गुरुवार, 27 ऑगस्टच्या सुरुवातीच्या सत्रात सोन्याचे भाव वधारले.

सोन्या-चांदीच्या किमतीत दरवाढीचा ट्रेंड सुरूच
मध्य-पूर्वेतील अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेली अनिश्चितता सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीला आधार देत राहिल्यामुळे गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या दरात जवळपास 0.46% वाढ झाली. यासह भारतीय वायदा बाजारात MCX वर सोन्याचे फ्युचर्स आदल्या दिवसाच्या घसरणीनंतर गुरुवारी 1.60 लाखांवर स्थिर राहिले तर, चांदीच्या फ्युचर्स किंमती 2.41 लाख रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.
Fixed Deposit: ऐका हो, FD करायची घाई करू नका; छोट्या-छोट्या गोष्टी ठरतात नुकसानदायी, अडकेल तुमच्या मेहनतीची कमाईदुसरीकडे, किरकोळ बाजारात ibja च्या आकडेवारीनुसार, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,59,400 रुपये 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,46,117 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. तसेच, आज चांदीचा दर 2,40,240 रुपये किलो इतका आहे. ग्राहकांनी लक्षात घ्या की, सराफ बिलामध्ये घडणावळ, कर आणि जीएसटी आकारले जातात ज्यामुळे वस्तूंची अंतिम किंमत वाढू शकते. तसेच पुढील काळात, अमेरिकेची जीडीपी आकडेवारी आणि अमेरिका-इराण यांच्यातील घडामोडी या बुलियन बाजारासाठी महत्त्वाचे घटक ठरतील.
सोने आणि चांदीचा आतापर्यंतचा परतावा
गेल्या वर्षी सोन्याच्या दरांनी 1979 नंतरची सर्वात मोठी तेजी नोंदवली आणि वर्षभर 75 टक्क्यांहून जास्त मोठी उसळी घेतली. मात्र त्याउलट अलीकडच्या काही महिन्यांत सोन्याची मागणी आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे पिवळसर धातूंच्या दरांमध्ये माफक वाढ झाली. दुसरीकडे, मजबूत मागणी आणि चलनातील चढ-उतारामुळे चांदीच्या दरांमध्ये त्याहूनही मोठी वाढ दिसून आली. 2023-24 मध्ये सामान्यतः 78,600 रुपये किलो असलेले चांदीचे दर ऑगस्ट 2026 पर्यंत 2,40,000 रुपये किलोवर पोहोचले.
सोने-चांदीच्या दरवाढीला कारणीभूत घटक
मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाला या मौल्यवान धातूंच्या किमतींमधील वाढीचे श्रेय दिले जाऊ शकते. गेल्या पाच महिन्यांपासून अमेरिका-इराण यांच्यात संघर्ष सुरू असून निवळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. अलीकडेच ट्रम्प प्रशासनाने सोमवारी इराणची अर्थव्यवस्था एकाकी पाडण्याची योजना जाहीर केली, ज्याअंतर्गत इस्लामिक रिपब्लिकला (इराणला) तग धरून ठेवण्यास मदत करणाऱ्या घटकांवर दुय्यम निर्बंध लादण्याची धमकी दिली. दुसरीकडे, इराणने अमेरिकेने सोमवारी जाहीर केलेले नवीन निर्बंध या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यास मदत करणार नाही असा इशारा दिला.

