अभिनयातील बारकावे आत्मसात करण्यासाठी कलाकार किती मेहनत घेऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण अभिनेत्री छाया कदम हिनं पुन्हा एकदा दिलं आहे. आगामी ‘गांधारी’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी छायानं बंगाली भाषेचे धडे गिरवले. व्यक्तिरेखा वास्तवदर्शी वाटावी आणि संवादातील भावछटा अचूकपणे मांडता याव्यात, यासाठी तिनं बंगाली शिकण्यासाठी मेहनत घेतली.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या छायानं आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हिंदीच्या पडद्यावर लक्षवेधी भूमिका साकारलेली छाया आता ‘पॅन इंडिया स्टार‘ झाली आहे. ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ मधील तिच्या अभिनयाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. ‘गांधारी’च्या निमित्तानं ती पुन्हा एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार असून, या भूमिकेसाठी केलेली भाषेची तयारी तिच्या अभिनयातील प्रयोगशीलता अधोरेखित करते.
याविषयी छाया सांगते, ‘माझ्यासाठी भूमिका म्हणजे केवळ कॅमेऱ्यासमोर उभं राहून संवाद बोलणं नाही. मी जी व्यक्तिरेखा साकारते, तिचं जग समजून घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. ‘गांधारी’ मधील व्यक्तिरेखेसोबत बंगाली भाषेचा एक वेगळाच संबंध आहे, त्यामुळे ती भाषा शिकणं गरजेचं होतं. सुरुवातीला नवीन भाषा शिकताना अनेक अडचणी आल्या. उच्चार, शब्दांची लय, बोलण्याची पद्धत या सगळ्याचा सराव करावा लागला. मात्र या प्रक्रियेमुळे व्यक्तिरेखेकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलली. भाषा शिकताना त्या पात्राच्या भावविश्वाच्या आणखी जवळ जाता आलं. मला संवाद फक्त पाठ करून बोलायचे नव्हते, तर ते पात्र ज्या पद्धतीनं विचार करतं, ज्या पद्धतीनं भावना व्यक्त करतं, त्या जाणिवेतून ते संवाद यावेत, अशी माझी इच्छा होती.’ प्रत्येक भूमिकेसाठी नव्यानं तयारी करण्याची छायाची ही पद्धत आणि व्यक्तिरेखेच्या मुळाशी जाण्याची वृत्ती यामुळे तिच्या आगामी भूमिकेबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या भूमिकांबद्दल बोलताना छाया कदम यांनी सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीला एकाच साच्यातील भूमिका मिळायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांत वेगळ्या धाटणीचे आणि लूकच्या दृष्टीनं वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स माझ्याकडे येत आहेत. ‘मडगाव एक्सप्रेस’ आणि ‘लापता लेडीज’नंतर विविध प्रकारची पात्रे साकारण्याचे अनेक दरवाजे उघडले आहेत.”
तापसी पन्नू आहे छाया कदम यांची फॅन
तर एका इव्हेंटमध्ये तापसीनं छाया कदम यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीची आठवण सांगताना म्हटलं की, मी जेव्हा छायाजींना भेटले, तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मी तुमची मोठी फॅन आहे आणि मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला असं विचारणं कधीकधी थोडं अवघडल्यासारखे वाटतं, कारण त्या भावना मला माहीत आहेत. पण ‘लापता लेडीज’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय पाहून मी अक्षरशः थक्क झाले होते.”
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा