Todays’ Gold and Silver Rates 14 July 2026: सोने आणि चांदीच्या दरांना पुन्हा एकदा अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावाची झळ बसताना दिसत आहे. पश्चिम आशियात अलीकडच्या हालचालींच्या उलट मंगळवार, 14 जुलै रोजी, सोन्याच्या किमतींनी पलटी मारली, तर चांदीच्या दरानेही महागाईचा बिगुल फुंकला. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि व्याज दरांबाबत वाढत्या अपेक्षा, ही कारणे मौल्यवान धांतूंच्या अलीकडच्या घसरणीला कारणीभूत ठरले आहेत.

सोन्या आणि चांदीच्या दरांवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दबाव पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यातील सततच्या घसरणीनंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी तेजीची उभारी घेतलेली ज्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळालेला, पण गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीवरून पुन्हा बिनसलं ज्याचा परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून आल्यावर मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंनी यु-टर्न घेतला.
सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा स्वस्ताईचा धमाका
जुलै महिन्याच्या पहिल्या 13 दिवसांत चांदीची किंमत 13000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली असून अलीकडच्या दबावामुळे सोन्यावर घसरणीचा दबाव कायम राहिला आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 1.40 लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे. यासोबतच चांदीचा वायदा दर उच्चांकावरून सातत्याने कोसळत असताना जुलै महिन्यातील केवळ 13 दिवसांत चांदीचा भाव 2.30 लाखांवरून 13,107 रुपयांनी तब्बल 2.17 किलोपर्यंत घसरला आहे.
सोने-चांदीचा आजचा दर काय
जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या बुलियन किमतीत झालेली वाढ आणि गुंतवणूकदारांनी कमी दरांवर केलेली खरेदी यामुळे मंगळवारी MCX वर सोने आणि चांदीच्या किमती वाढीसह व्यवहार करत आहेत. सकाळी 9.15 वाजता MCX वर सोन्याचा वायदा 668 रुपायांनी वाढून 1,40,977 रुपयांवर वाढला तर, चांदीचे फ्युचर्स 732 रुपयांनी वाढून 2,18,450 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे तर मंगळवार, 14 जुलै रोजी, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीवर दबाव कायम राहिला. सुरुवातीच्या सत्रात COMEX वर सोन्याची किंमत 0.04 टक्क्यांनी किंचित घसरून 4,004 डॉलर प्रति औंसवर खाली आली, तर चांदीचा भाव 1.06 टक्क्यांनी कमी होऊन 57.355 डॉलरवर उतरला. मध्यपूर्वेतील तणावाच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांची चिंता नक्कीच वाढली असेल, पण तरीही मौल्यवान धातूंची खरेदी फिकी पडताना दिसत नाही.
सोन्या-चांदीवरील दबावाचे कारण काय
सामान्यतः युद्ध, लष्करी तणाव किंवा भू-राजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. म्हणूनच सोन्याला एक सुरक्षित मालमत्ता मानले जाते पण, सध्या दोन भिन्न शक्ती बाजारावर परिणाम करत आहेत. एकीकडे पश्चिम आशियामधील अमेरिका-इराण तणाव सोन्यासाठी सकारात्मक घटक ठरत आहे तर दुसरीकडे, अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वर्चस्व गाजवत आहे.
ट्रम्प यांच्या पोस्टनी वाढवली नवीन चिंता
इराणवर क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी बंदरांवर पुन्हा सागरी नाकेबंदी लागू करण्याची घोषणा केली. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर त्यांनी 20 टक्के शुल्क लावण्याचा प्रस्तावही मांडला. यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव आणखी वाढला, ज्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरही झाला असून ब्रेंट क्रूडने 1 महिन्यातील उच्चांक गाठला. अशा परिस्थितीत, तेलाच्या किमतीतील वाढल्यामुळे जागतिक महागाई वाढण्याची भीतीही निर्माण झाली.

