शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शिक्षणमहर्षी डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे सोमवारी 4 ऑगस्ट रोजी वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील त्यांच्या ‘यशवंत’ निवासस्थानी सकाळी साधारण 11 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्यासह देशभरातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, शिक्षण क्षेत्रातील एका युगाचा अंत झाल्याची भावना राज्यासह देशभरातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचविण्याचा ध्यास घेत अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन आणि इतर विविध शाखांमध्ये त्यांनी उभारलेली शैक्षणिक व्यवस्था आज देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र बनली आहे. शिक्षणाबरोबरच समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
सतेज पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
वडिलांच्या निधनानंतर माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत, “आमच्या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, समाजसेवा आणि माणुसकीची मूल्ये जपली. हजारो नव्हे, तर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी आशेचा दिवा पेटवला,” अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावरील पोस्टमधून डॉ. पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षणाचा प्रसार आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. याशिवाय राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनीही त्यांना आदरांजली वाहिली.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांना पितृतुल्य व्यक्तिमत्त्व संबोधत त्यांच्या निधनामुळे शिक्षण आणि सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाल्याचे म्हटले. आमदार अमल महाडिक यांनी “ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा एक ऋषितुल्य नेता आपल्यातून गेला,” अशी भावना व्यक्त केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून देण्यात डॉ. पाटील यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव करत श्रद्धांजली वाहिली.
राजकीय मतभेद विसरून नेत्यांची उपस्थिती
डॉ. पाटील यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून राजकीय मतभेद असतानाही माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी यशवंत निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांनी सतेज पाटील आणि कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीकडे कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीतील सकारात्मक आणि संवेदनशील क्षण म्हणून पाहिले जात आहे.
राज ठाकरे यांनीही दिला धीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कोल्हापुरात येऊन डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच शिक्षण आणि समाजकारणातील त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांचे पार्थिव मंगळवारी (5 ऑगस्ट) सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कसबा बावडा येथील ‘यशवंत’ निवासस्थानी नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पॅव्हिलियन मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डी. वाय. पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने केवळ एक शिक्षणतज्ज्ञ नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणणारे दूरदृष्टीचे नेतृत्व हरपल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी निर्माण केलेल्या संस्था पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, अशी भावना शोकसंदेशांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा