Headlines

Nashik Yeola Highway Horrific Luxury Bus Accident One Dead; नियंत्रण सुटलं, रस्त्याच्या मधोमध बस उलटली, प्रवाशांच्या किंकाळ्या; नाशिकमध्ये भल्यापहाटे खासगी बसचा भीषण अपघात


Nashik Bus Accident : येवला-नांदगाव मार्गावर मंगळवारची सकाळ काळजाचा थरकाप उडवणारी ठरली. या मार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला. सोमठाणे घाटात मध्य प्रदेशातील लक्झरी बसचा आज सकाळी अपघात झाला. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Nashik Bus Accident
नाशिक येवला लक्झरी बस अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : येवला-नांदगाव राज्य महामार्गावरील सोमठाणे जोश घाटात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एक खासगी लक्झरी बस उलटल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे.

नियंत्रण सुटलं आणि बस उलटली

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी लक्झरी बस मध्य प्रदेशातील होती. आज सकाळी सोमठाणे जोश घाटातून जात असताना, अचानक चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस घाटातच उलटली. अपघाताच्यावेळी बसमध्ये सुमारे 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. बस उलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ आणि किंकाळ्या ऐकायला मिळाल्या.
Maharashtra TimesPune Water Cut: पुणेकरांचे हाल होणार! शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा; पाणीकपात कधीपासून लागू करणार?
या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 5 ते 6 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, लक्झरी बस थेट रस्त्याच्या मधोमध आडवी झाली. यामुळे येवला-नांदगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पोलीस प्रशासनाकडून बस बाजूला करण्याचं आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दोन्ही महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढणार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने २८ रस्त्यांना मंजुरी देतानाच तपोवनातील महत्त्वाच्या जनार्दन स्वामी मठ-लक्ष्मी नारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक रस्त्याला अखेर सुधारित मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी प्राधिकरणाने अवघा १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, १५ कोटींत या रस्त्याचे काम होऊ शकत नसल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्राधिकरणाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्राधिकरणाने या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केल्याने सिंहस्थापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra TimesMaharashtra Weather: ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज
नाशिकमध्ये सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविक, साधू-महंतांच्या सुविधेसाठी विविध कामे करण्यासाठी पालिकेने १५ हजार कोटींचा आराखडा सादर केला होता. त्यात जनार्दन स्वामी मठ, लक्ष्मीनारायण पूल ते ड्रीम सिटी दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, या निधीतून रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण शक्य नसल्याचा दावा महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्राधिकरणाकडे केला होता.

तपोवनाला जोडणारा जनार्दन स्वामी मठ ते ड्रीम सिटी चौक हा रस्ता सिंहस्थासाठी महत्त्वाचा असल्याने त्याच्या कामासाठी ३० कोटींचा निधी मिळावा अशी मागणी महापालिकेने केली होती. अखेर प्राधिकरणाने महापालिकेच्या मागणीला मंजुरी दिली असून, या रस्त्यासाठी ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा