Builder Buyer Agreement: एक आश्वासन दिलं अन् काहीतरी वेगळंच मिळालं… मालमत्ता खरेदी केल्यानंतर बिल्डर आणि खरेदीदार या दोघांमध्ये फसवणुकीची प्रकरणे सर्रास घडतात. यामागंचे प्रमुख कारण म्हणजे की खरेदीदाराला करार नीट समजलेला नसतो, असं तज्ञांचे म्हणणे आहे.भविष्यात कोणतीही अडचण टाळायची असेल, तर घर खरेदी करताना Builder-Buyer Contract मध्ये लिहिलेल्या अटी व शर्ती नीट समजून घ्या.

मालमत्ता खरेदी करताना हलगर्जीपणा करू नका!
घर, फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदीचा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आर्थिक निर्णय असतो. यासाठी सर्वसामान्य लोक बँकेकडून कर्ज घेतात, अगदी आपल्या आयुष्यभराची बचतही पणाला लावतात. पण, अनेक खरेदीदार BBA करारातील अटी व शर्ती पूर्णपणे न समजता त्यावर सही करतात ज्यामुळे नंतर घराचा ताबा मिळण्यास विलंब, छुपे शुल्क, पार्किंगच्या जागेच्या समस्या, बांधकामाच्या गुणवत्तेतील समस्या, करार रद्द केल्याबद्दल दंड आणि परताव्याच्या समस्या यांसारख्या अडचणींना सामोरे जावे लागते.
Indian Taxpayer Viral Post : 26,600 रुपयांच्या डिव्हिडंटवर 26,300 रुपये टॅक्स-व्याज, महिला म्हणते- ‘आता 300 रुपयांचं काय करू?’
अशा परिस्थितीत, तुम्ही घर खरेदी करणार असाल तर भविष्यातील संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी हा करार समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बिल्डर-खरेदीदार करार म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? खरेदीदारांनी करारातील कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे आणि RERA कायदा खरेदीदारांना कशी मदत करतो? समजून घेऊया.
बिल्डर-खरेदीदार करार म्हणजे काय?
बांधकामाधीन असलेल्या मालमत्तेच्या खरेदीदरम्यान BBA करार रिअल इस्टेट डेव्हलपर आणि घर खरेदीदार यांच्यात केला जातो. या करारामध्ये मालमत्तेचा तपशील, पेमेंटच्या पद्धती, ताबा मिळण्याची वेळ, बांधकामाचा तपशील, पार्किंगचे वाटप, विलंबासाठी दंड, करार रद्द करण्याचे नियम आणि दोन्ही पक्षांचे हक्क व जबाबदाऱ्या यासंख्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. एकदा स्वाक्षरी केल्यास संपूर्ण करार कायदेशीर ठरतो आणि रेराच्या नियमानुसार बिल्डर कराराशिवाय खरेदीदारांकडून मालमत्तेच्या किमतीच्या 10% पेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत.
आता बचतही होणार अन् फायदाही; HDFC बँकेने महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी आणली विशेष स्कीम
BBA कराराचे महत्त्व काय?
घर किंवा फ्लॅट खरेदी करताना बहुतेक लोक फ्लॅटची किंमत, सवलती, ईएमआय ऑफर्स आणि सुविधा यांवर लक्ष केंद्रित करतात. पण यासोबतच हा करार पूर्णपणे समजून घेण्यावरही तज्ञ जोर देतात, कारण कोणताही वाद निर्माण झाल्यास न्यायालये आणि रेरा कायदे केवळ नोंदणीकृत करार, कराराच्या अटी आणि इतर अधिकृत कागदपत्रांचाच विचार करतात. त्यामुळे करारामध्ये एखादी गोष्ट स्पष्ट नमूद केलेली नसल्यास नंतर सिद्ध करणे कठीण होऊ शकते.
करारातील कोणत्या अटींकडे खरेदीदारांनी विशेष लक्ष दिले पाहिजे?
- घर, फ्लॅटचा ताबा मिळण्याची तारीख
- कार्पेट एरिया आणि सुपर बिल्ट-अप एरिया
- देयकाचे वेळापत्रक
- पार्किंगची जागा
- प्रकल्पाला विलंब झाल्यास दंड
- कॅन्सलेशन आणि परतावा धोरण
- बांधकामाचा तपशील
- फोर्स मेज्योर कलम
फोर्स मेज्योर कलम काय असतो?
बांधकाम व्यावसायिक अनेकदा करारात फोर्स मेज्योर कलम जोडतात, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, सरकारी मंजुरीस विलंब किंवा बांधकाम साहित्याची कमतरता यांसारख्या परिस्थितींचा समावेश असतो. अशा प्रकरणांत बांधकाम व्यावसायिक प्रकल्पास विलंब करण्याचे समर्थन करू शकतो, पण कलम खूप व्यापक नसावे हे खरेदीदारांनी सुनिश्चित केले पाहिजे जेणेकरून ताबा मिळण्यास मोठ्या विलंबाचे समर्थन करण्यासाठी याचा अनेकदा वापर केला जातो.

