Headlines

Chief Minister Devendra Fadnavis Interacted with the Protesters on Ahilyanagar Dhiraj Pardeshi Death Case; धीरज परदेशी प्रकरण; CM देवेंद्र फडणवीसांचा आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद, आरोपींना शिक्षा देण्याची ग्वाही देत संतापले


Chief Minister Devendra Fadnavis on Ahilyanagar Dheeraj Pardeshi Death Case : ‘धीरजच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल’, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला.

Chief Minister Devendra Fadnavis on Ahilyanagar Dheeraj Pardeshi Death Case
अहिल्यानगर धिरज परदेशी हल्ला प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनं संतप्त झालेल्या अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत धीरज परदेशी यांच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ‘धीरजची हत्या झाली, ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेतील आरोपींना आम्ही सोडणार नाही’, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ‘मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारकडून कोणतीही कसर ठेवली जाणार नाही’, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ‘हत्यारांना फाशी झाली पाहिजे, यासाठी जी कायदेशीर कारवाई करता येईल, ती आम्ही करू’, अशी ठाम ग्वाही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्धार

‘अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही’, असा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत विविध संघटना आणि नागरिकांकडून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना सरकारने गांभीर्यानं घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

Maharashtra TimesPune-Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत
‘अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही’, असा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यामुळे धीरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींवर आता कठोर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्याचंही मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘आपण ज्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहात, त्यावर सरकार सकारात्मक पावलं उचलत आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घ्यावं’, असं आवाहन फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.

मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

धीरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी कायदेशीर पातळीवर सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesSwine Flu Cases Nashik: नाशिककरांनो सावधान! शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका, तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह

नेमकी घटना काय?

मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा कब्रस्तानाजवळ कर्तव्य बजावत असताना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेला जमावाचा जीवघेणा हल्ला अखेर त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला. शुक्रवारी 7 ऑगस्ट सायंकाळी 10 ते 15 जणांच्या जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांची गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं अहिल्यानगर शहर हादरलं असून, संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

जिथे मारहाण झाली, तिथेच अंत्यविधी करा; पत्नीची मागणी

धीरज परदेशी यांच्या पत्नीनं अत्यंत संतप्त मागणी केली आहे. ‘माझ्या पतीला ज्या कब्रस्तानात मारहाण करण्यात आली, त्याच कब्रस्तानात त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढलं असून, प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

Maharashtra TimesGadchiroli Student Death :सर्पदंशाच्या घटनेनंतर आश्रमशाळांसाठी नवी ‘एसओपी’

चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत कारवाई सुरू केली. पोलिसांनी काल रात्री युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा