Headlines

Chhatrapati Sambhajinagar Tisgaon Khavdya Mountain Mother Father and Son Died Tragic Incident; ‘आई, आता काही सोल्यूशन नाही’; आई-बापाच्या विनवण्या, लेकराला वाचवण्यात तिघांनी जीव गमावला; खवड्या डोंगरावरचा थरार


Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Mountain : छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhajinagar Tisgaon Khavdya Mountain Mother Father and Son Died Tragic Incident
छत्रपती संभाजीनगर खवड्या डोंगर मुलासह आई वडिलांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : तिसगाव येथील खवड्या डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना आई-वडिलांचाही दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव असून, वडील मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८) व आई संगीता मुरलीधर चांदगुडे (वय ४२, रा. अक्षयबन सोसायटीसमोर, झाल्टा फाटा, ता. छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. कर्जत पिंपळगांव, ता. अंबड, जि. जालना) असे डोंगरावरून दरीत पडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

आईनेसुद्धा दरीत उडी मारली

याविषयी माहिती अशी, की तिसगाव परिसरातील धुळे-सोलापूर महामार्गाच्या जवळीलखवड्या डोंगरावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कुणाल चांदगुडे आत्महत्या करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याचे आई-वडीलही त्याच्या मागे खवड्या डोंगरावर चढले. ‘आत्महत्या करू नको,’ अशी त्यांनी अनेकदा विनवणी केली. मात्र, कुणाल डोंगराच्या काठावर उभा राहून ‘एकच सोल्यूशन आहे; आता काही सोल्यूशन नाही’ असे म्हणत होता. सकाळी दहा ते दुपारी एका वाजेपर्यंत कुणाल डोंगराच्या काठावर उभा होता. त्याला वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील व परिसरातील नागरिक, पोलिस, अग्निशमन विभाग प्रयत्न करीत होते. त्यावेळी कुणालचे वडील तो ऐकत नसल्याचे पाहून त्याला पकडण्यासाठी त्याच्या जवळ गेले असता दोघांचाही तोल जाऊन दरीत पडले हे दृश्य पाहून कुणालच्या आईनेसुद्धा दरीत उडी मारली.

Maharashtra TimesTukaram Mudhe : भाजी करण्यासाठी दुर्गंधीयुक्त पनीर, तुकाराम मुंढेंची पुन्हा धडक कारवाई, तपासणीत गंभीर त्रुटी; नामांकित हॉटेलला दणका

थरारानंतर डोंगरावर स्मशानशांतता

काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांच्या हृदयाचे ठोके थांबले होते. तब्बल तीन तासांच्या थरारानंतर डोंगरावर स्मशानशांतता होती. या पूर्वीही या खवड्या डोंगरावरून उडी मारून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. यासाठी या डोंगराला चहूबाजूने कंपाउंड करण्याचा प्रस्ताव नागरिकांनी दिला होता; मात्र अद्याप त्यावर कारवाही झाली नसल्याने पुन्हा तिघांचा बळी गेला अशी भावना नागरिक व्यक्त करीत होते. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी ‘घाटी’त पाठविले.

पोलिस, अग्निशमन यांचे प्रयत्न

खवड्या डोंगरावर एक तरुण आत्महत्या करण्यासाठी चढला असल्याची माहिती मिळाल्यावर वाळूज एमआयडीसीचे पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते. या वेळी पोलिसांनी तरुणाची सलग तीन तास मनधरणी केली, तर अग्निशमन दलाचे जवान दरीमध्ये सुरक्षाजाळी धरून उभे होते; मात्र तो तरुण वारंवार जागा बदलत असल्याने बचावकार्य करण्यासाठी कठीण झाले होते. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेकडो नागरिकांच्या डोळ्यादेखत एकापाठोपाठ एक असा तिघांचाही दरीत पडून मृत्यू झाला.

Maharashtra TimesPune News : पुणेकरांनो तुमच्या वाहनांना नवी ओळख मिळणार! ‘एमएच १२’ची नवी ओळख आता ‘एमएच ६१’, कारण काय?

खवड्या डोंगर मृत्यूचा केंद्रबिंदु

तिसगावचा खवड्या डोंगर गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांच्या आत्महत्येचे केंद्रबिंदू बनत असून वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तिहेरी मृत्यूच्या घटनेत मुलासह आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने डोंगरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश दुधाट यांनी केली आहे. तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस, अग्निशमन करणचारी, नागरिक व त्याच्या वडिलांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. सर्वांच्या डोळ्यांसमोर ही दुर्दैवी घटना घडत असताना मुलगा व पतीचा दुर्दवी अंत पाहताना मुलाच्या आईनेही टोकाचे पाऊल उचलत त्यांच्या मागे दरीत उडी मारून आयुष्य संपवले. समाजाच्या व प्रशासनाच्या संवेदनशीलतेला दिलेला गंभीर इशारा आहे. माणुसकी म्हणून आपण नेमके कुठे कमी पडत आहोत हा प्रश्न या निमित्ताने पडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांनी सांगितले.

माजी सरपंच जाधव यांचे प्रयत्न

तिसगाव येथील माजी सरपंच संजय जाधव यांनी माहिती देताना, ‘शेतावर जात असताना एक तरुण सकाळी दहा वाजता खवड्या डोंगराच्या टोकावरील धोकादायक कड्यावर उभा असताना दिसला. त्या वेळी जाधव यांनी त्याला समजावत असताना तू सुशिक्षित आहेस आत्महत्या कशाला करतो असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांच्यासोबत त्याची आई व पोलिस होते. मात्र, तो नाकारून ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता असे जाधव यांनी सांगितले. या वेळी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तेथे बसून होतो; मात्र आमच्या प्रयत्नांना यश आले नाही, असे प्रत्यक्षदर्शी संजय जाधव यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : काळजाचा तुकडा वाचवताना आई-बापही दरीत कोसळले; 3 तास डोंगरावर थरार, एकाच कुटुंबाचा करुण अंत

मागणी करूनही सुरक्षा नाही

या डोंगरावर यापूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्या असून, त्यामुळे डोंगराच्या बाजूने; तसेच धोकादायक कड्यांच्या ठिकाणी सुरक्षा कठडे, संरक्षक जाळ्या व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा तिघांचा बळी गेला असून, अजून किती जणांचे बळी घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा