Chhatrapati Sambhajinagar Gayatri Mewar Restaurant FDA Raid : ‘सर्व हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपेय विक्रेत्यांनी ग्राहकांना सुरुक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न पुरवणे ही त्यांची वैधानिक जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवावे’, असं अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्रीकांत करकळे यांनी म्हटलं आहे.
संभाजीनगर गायत्री मेवाड रेस्टॉरंट रेड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरातील क्रांती चौक परिसरातील गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड रेस्टॉरंटला अन्न व औषध प्रशासन विभागाने दणका दिला. शुक्रवारी अचानक केलेल्या तपासणीदरम्यान इथे अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन दिसले. तत्पूर्वी, गुरुवारी विभागाने बीड बायपास, सातारा परिसरातील छप्पन भोग थाळी रेस्टॉरंटवर कारवाई केली.
तपासणीत गंभीर त्रुटी
विभागाने दोन्ही ठिकाणी केलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या.गायत्री मेवाड रेस्टॉरंटमध्ये अन्न व्यवसाय ऑपरेटरनुसार (एफबीओ) साठवलेल्या पदार्थांची तपासणी, त्यांचे शेल्फ लाइफ आणि वापरापूर्वी घ्यायची काळजी प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे दिसून आले. तयार खाद्यपदार्थांवर कालावधी नव्हता. सार्वजनिक आरोग्याचा हा गंभीर धोका लक्षात घेता, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त द. वि. पाटील यांनी गायत्री मेवाड रेस्टॉरंटचा परवाना तत्काळ निलंबित केला. निलंबन कालावधीत व्यवसायिकाने कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करू नये. अन्यथा वैध परवान्याशिवाय अन्न व्यवसाय केल्याबद्दल त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अधिक कडक कायदेशीर फौजदारी कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा विभागाने दिला आहे.
गायत्री मेवाड रेस्टॉरंटमध्ये तपासणी केल्यानंतर तिथे भाजी करण्यासाठी दुर्गंधीयुक्त पनीरहोते. कंटेनरमध्ये पनीर ऑफ ऑडर होते. अन्न सुरक्षा अधिकारी के. एल. झाडे यांनी गुरुवारी शहरातील बीड बायपास रस्त्यावरील छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉलची तपासणी केली. इथल्या स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या ज्वारी व बाजरीच्या पिठामध्ये जिवंत कीटक आढळून आले.
विभागाने गायत्री मेवाड रेस्टॉरंटची १८ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या तपासणीत त्रुटी आढळल्या होत्या. २९ डिसेंबर २०२५ रोजी सुधारणा नोटीस देण्यात आली होती. मात्र, विभागाच्या नोटिशीला रेस्टॉरंटने पूर्णपणे केराची टोपली दाखवली. इतकेच नव्हे, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या आस्थापनेला १० एप्रिल २०२६ रोजी ५० हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता. तरीही या रेस्टॉरंटने आपल्या कार्यपद्धतीत कोणतीही सुधारणा केली नाही.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा