Headlines

Accident on mumbai pune expressway 10 injured traffic disrupted; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोगद्यात ट्रॅव्हल बसची चार वाहनांना धडक; १० जण जखमी


अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भाताण बोगद्यात आज सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. पुणे लेनवर झालेल्या या अपघातात एक टेम्पो आणि तीन कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आठ ते दहा जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या धडकेनंतर एकामागोमाग एक अशी चार वाहने अपघातग्रस्त झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील पुणे लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच तरुणाचा मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 7 ऑगस्ट रोजी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी भयानक होती की फॉर्च्युनर कार व मालवाहू टेम्पो ही दोन्ही वाहने महामार्गावर उलटली. झालेल्या भीषण अपघातात पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड (वाकड) येथील तरुण राजकीय कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर इतर ४ जण जखमी झाले होते. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक जवळपास २ तास विस्कळीत झाली होती.

दरम्यान, राज्यातील सर्वांत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत