Headlines

Ganeshotsav 2026: देवाक काळजी रे! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा, एसटीच्या ‘ग्रुप बुकिंग’चे अतिरिक्त शुल्क रद्द – ganeshotsav 2026 st bus group booking extra charges cancelled big relief to kokan devotee


Ganpati ST Bus Group Booking: समूह आरक्षणासाठी अतिरिक्त शुल्क लावण्यामुळे गणेशभक्तांचा प्रवास महागल्याचा मुद्दा सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने बातमीच्या माध्यमातून मांडला होता.

Anderson Phillip Catch - 2026-08-22T113658
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : संपूर्ण एसटी बस आरक्षित (ग्रुप बुकिंग) करण्यासाठी आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क अखेर एसटी महामंडळाने रद्द केले आहे. त्यामुळे गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाने शुक्रवारी हा निर्णय घेतला.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ‘गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे पाच हजार एसटी बसगाड्या आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना गावी सोडल्यानंतर या बसगाड्या रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे महामंडळाला इंधन तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीचा खर्च वाढला आहे.

Maharashtra TimesVishakha Raut : महापौर आणि आमदार राहिलेल्या विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द, मुंबईत ठाकरेंना मोठा धक्काया पार्श्वभूमीवर ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोकणवासी आणि गणेशोत्सव मंडळांकडून अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची सूचना केली. त्यानुसार यंदा एकेरी गट आरक्षणावर (ग्रुप बुकिंगवर) ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही,’ असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाला होणारा संभाव्य आर्थिक तोटा अन्य मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढावा, अशा सूचना ही मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला केल्या आहेत.

मुंबईतील कोकणवासींची स्वस्त प्रवासासाठी भिस्त असलेल्या एसटीच्या भाडेवाढीविरोधात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सर्वप्रथम ‘समूह आरक्षणास मोजा अधिक पैसे’ या मथळ्याखाली ११ ऑगस्टला बातमी प्रसिद्ध केली होती. ही कोकणवासी प्रवासी संघटनांमध्ये चर्चेची बातमी ठरली. ‘मटा’ने याचा सातत्याने पाठपुरावा केला. या मुद्द्यावरून कोकणवासी प्रवासी संघाने आंदोलनाचा निर्णय घेतला होता.

Ashish Shelar | ठाकरेंनी डिवचलं, आशिष शेलारांचा पलटवार, ठाकरे बाप-लेकावर तुटून पडले

खासगी वाहतूकदारांवर निर्बंध आवश्यक
‘गणेशोत्सवाआधीच बाप्पा पावल्याने ३० टक्के भाडेवाढीचे संकट दूर झाले. आता समूह आरक्षणासाठी कोकणवासींमध्ये उत्साह आहे. जुलैमध्ये लागू केलेल्या १३.५ टक्के भाडेवाढीबाबतही विचार व्हायला पाहिजे. भाडेवाढ करून प्रवासी दुरावतो. सेवेत सुधारणा आवश्यक आहे. खासगी वाहतूकदारांवरील निर्बंधाचे काटेकोर पालन आवश्यक आहे,’ असे गणेशभक्त कोकणवासी प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांनी आभार मानले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा