Headlines

Chhatrapati Sambhajinagar Tisgaon Khavdya Mountain Mother Father Son Died Relatives Emotional in Hospital After Seeing Body; ‘दादा, आता राखीसाठी कुणाला फोन करु रे?’, कुणालच्या आत्यांचा रुग्णालयात तिघांच्या बॉडी बघून आक्रोश; उपस्थितांचे डोळे पाणावले


Chhatrapati Sambhajinagar Kunal Chandwade Jumps Down From Khavdya Mountain : ‘दादा, 10 दिवसांवर आलेल्या पौर्णिमेला राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’ या बहिणीच्या आकांताने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते

Chhatrapati Sambhajinagar Kunal Chandwade Jumps Down From Khavdya Mountain
तिसगाव खवड्या डोंगर दुर्घटना(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : स्वतःचा जीव देण्याच्या प्रयत्नात असलेल्या आपल्या पोटच्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही डोंगरावरून खाली पडून मृत्यू झाल्याची काळजाचा ठोका चुकवणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडली. या दुर्दैवी घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे या एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर घाटी रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर कुणालच्या आत्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांची छाती दडपून टाकणारा होता.

‘दादा, आता राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’

मृत मुरलीधर चांदवडे यांना तीन बहिणीआहेत. पाच महिन्यांपूर्वी एका भाच्याच्या लग्नात काही कारणांमुळे त्यांना सहभागी होता आलं नव्हतं. त्यामुळे भाऊ आणि बहिणींची भेट होऊ शकली नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्यांची एक बहीण आणि भाच्याला भेटण्याबाबत चर्चाही झाली होती. मात्र, भेटीआधीच काल शुक्रवारी एकाचवेळी भाऊ, भावजय आणि भाच्याच्या मृत्यूची बातमी धडकली. घाटी रुग्णालयात भावाचा मृतदेह पाहताच बहिणीला अश्रू अनावर झाले. ‘दादा, 10 दिवसांवर आलेल्या पौर्णिमेला राखीसाठी कोणाला कॉल करू रे?’ या त्यांच्या आकांताने आणि आर्त हाकेनं संपूर्ण घाटी परिसर सुन्न झाला होता आणि तेथे जमलेल्या उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : ‘आई, आता काही सोल्यूशन नाही’; आई-बापाच्या विनवण्या, लेकराला वाचवण्यात तिघांनी जीव गमावला; खवड्या डोंगरावरचा थरार

आई आणि लेकाचा काळीज चिरणारा शेवटचा संवाद

दरम्यान, वडिलांशी झालेल्या वादानंतर कुणाल सकाळी 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला होता. तो टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचं समजताच आई-वडील, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिक त्याला वाचवण्यासाठी गेले. सुमारे तीन तास त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू होते.

‘आई, माझं कोणीच ऐकत नाही’

आईने कुणालला खाली उतरवण्यासाठी जिवाच्या आकांताने विनवणी केली. ‘तुझा पप्पांसोबत वाद आहे ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस,’ अशी आर्त हाक आई देत होती. मात्र, हताश झालेल्या कुणालने ‘आई, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्याकडे आता काही सोल्यूशनच नाही,’ असं म्हणत त्याने उडी मारली.

Maharashtra TimesTukaram Mudhe : भाजी करण्यासाठी दुर्गंधीयुक्त पनीर, तुकाराम मुंढेंची पुन्हा धडक कारवाई, तपासणीत गंभीर त्रुटी; नामांकित हॉटेलला दणका

वडिलांचा वाचवण्याचा प्रयत्न आणि तिघांचा दुर्दैवी अंत

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि आई कुणालचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, गर्दीतून अचानक पुढे आलेल्या वडिलांनी मुलाला पकडून मागे ओढण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत तोल गेल्यानं मुलगा आणि वडील दोघेही डोंगरावरून खाली कोसळले. डोळ्यांदेखत पती आणि मुलाला खाली पडताना पाहून आई संगीता यांनीही त्याचवेळी डोंगरावरून उडी घेतली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा