Headlines

Chhatrapati Sambhajinagar-Pune Highway: महामार्गावर जीवघेणे खड्डे! छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात, वाहनचालक संतप्त


वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल होत असून, खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक, वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.

पंढरपुरातील तिरंगा चौक, कामगार चौक, एएस क्लब चौकात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने खड्ड्यांत आदळून अपघात होत आहेत. वाळूज ‘एमआयडीसी’ परिसरात हजारो कामगार, कर्मचारी, मालवाहू ट्रक, कंटेनर, बस व दुचाकीचालकांची मोठी वर्दळ असते.

Maharashtra TimesAbhijeet Dipke CJP Meeting: सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक
या चौकामध्ये अपघातात अनेक जणांनी प्राण गमावले असून, अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. महामार्गावरील काही ठिकाणी खड्डे इतके खोल झाले आहेत, की त्यात आदळल्याने वाहनांचा वेग अचानक कमी करावा लागतो. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक बसून अपघात होतात. यामध्ये दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत असून, रात्रीच्या वेळी प्रकाशाची अपुरी व्यवस्था असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.

या प्रकरणी स्थानिक नागरिक, उद्योजक, वाहनचालकांनी संबंधित यंत्रणेकडे अनेकदा तक्रारी करूनही कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. एमआयडीसीत उद्योगनिमित्त येणाऱ्या देश-विदेशातील व्यावसायिकांवरही या रस्त्यांची नकारात्मक छाप पडत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. येथील खराब रस्त्यांमुळे साहित्य वाहतुकीसाठी विलंब होत असून, वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ झाली असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

तातडीने रस्ते दुरुस्ती करावी

सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेसंयुक्तपणे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, धोकादायक ठिकाणी फलक लावावेत, अपघात घडणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : नियमांनुसार काम करायचं नसेल तर राजीनामा देऊ शकतात, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तुकाराम मुंढे यांची भूमिका
वाळूज एमआयडीसीत देशभरातून साहित्य वाहतूक करण्यासाठी हजारो वाहने येतात. महामार्गावर खड्डे असल्याने कोंडी होऊन वाहतूक मंदावते. त्यामुळे अनेकदा मालवाहतुकीला विलंब होतो. परिणामी, उद्योगांचे आर्थिक नुकसान होते.-राहुल मोगले, उपाध्यक्ष, मासिआ

रोज कामानिमित्त शहरातून दुचाकीवरून वाळूज एमआयडीसीत ये-जा करावी लागते. रस्त्यांवरील खड्डे चुकवताना अनेकदा अपघात होतात. दुचाकी घसरून अपघात घडले आहेत. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी.-नितीन दिवेकर, कंपनी कामगार

माझ्याकडे मालवाहतूक करणारे वाहन असून, एमआयडीसीतील कंपन्यांतून साहित्याची वाहतूक करतो. महामार्गावरील व अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठे नुकसान होत आहे. वाहन खड्ड्यांत आदळल्याने नादुरुस्त झाल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च लागत असल्याने आर्थिक बजे कोलमडत आहे. – प्रदीप चारथळ, वाहनचालक

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत