Headlines

Human rights commissions strict inquiry into pune police misconduct case; तीन आरोपींना कारवर बसवून शहरात फिरवलं, पोलिसांच्या व्हिडिओंची चौकशी सुरू; जबाब नोंदवले


म. टा. प्रतिनिधी, पुणे: पोलिसांकडून आरोपींना मारहाण आणि गैरवर्तनाचे कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याबरोबरच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चौकशी केली. राज्य मानवी हक्क आयोगाने नियुक्त केलेल्या समितीत जिल्हा न्यायाधीश दर्जाचे रजिस्ट्रार, पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी विश्वास पांढरे आणि अन्य एका सदस्याचा समावेश आहे. समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भेट देऊन संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तीन अल्पवयीन संशयितांना पोलिस वाहनावर बसवून आणत असताना एका महिलेने त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याआधी दुसऱ्या एका प्रकरणात काही आरोपींना गुडघ्यावर बसवून भर रस्त्यातून फिरविल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या.

या पार्श्वभूमीवर मानवी हक्क आयोगाने स्वतःहून दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. समितीने घटनांशी संबंधित सर्व बाबींची पडताळणी केली असून, वस्तुस्थितीचा अहवाल आयोगाकडे सादर केल्यानंतर संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कायदेशीर; तसेच प्रशासकीय कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनीही या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेऊन अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे या चौकशीची जबाबदारी दिली आहे.

दरम्यान, राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीस महासंचालकांना दिलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांची भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत