Usha Nadkarni Life Story: वडिलांनी केला कोयत्यानं हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, मुलगा आजही आई मानत नाही; ८० व्या वर्षी एकाकीपण,अभिनेत्री उषा नाडकर्णींच्या आयुष्यात घडलंय बरंच काही
मुंबई: सिनेविश्वातील अभिनेत्रींचं आयुष्य हे अनेकदा पडद्यावर दिसतं त्याहून बरंच वेगळं असतं. अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितलं आहे. आता अभिनेत्री उषा नाडकर्णी चर्चेत आल्या आहेत. मुलगा, सून असतानाही त्या वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्या एकट्या राहत असल्याचं सांगतात. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा… नेहमी कडक आणि खाष्ट सासू साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या…
