Pradeep Rawat son on Father Last Moments:’गजनी’ आणि ‘लगान’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ७४ व्या वर्षी रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देताना त्यांचं निधन झालं होतं.

गेल्या काही महिन्यांपर्यंत प्रदीप हे शूटिंग करत होते. पण महिन्याभरापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला, तपासात त्यांना दुर्मिळ अशा रक्ताच्या कर्करोगाचे निदान झालं होतं, असं विक्रमादित्य रावतनं सांगितलं. वडिलांच्या आजारपणाचा आणि त्यांच्या शेवटच्या क्षणांचा हृदयद्रावक प्रवास शेअर करताना तो भावुक झाला होता.
Star Pravah Serial:ती गोड बोलते, पण तिच्या प्रत्येक कृतीमागे एक वेगळा हेतू असतो; स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार अमृता धोंगडे, भूमिकेची चर्चा
विक्रमादित्य रावतनं सांगितलं की, अवघ्या काही आठवड्यांपूर्वीपर्यंत सर्वकाही अगदी ठिक होतं. वडिलांचे आरोग्य उत्तम होतं. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि अवघ्या काही आठवड्यांत सर्वकाही बदलून गेलं. त्यांना उचक्या यायला सुरुवात झाली, कोणाला वाटलं असेल उचक्या म्हणजे कॅन्सर असेल. त्रास सुरू झाल्यानंतर आम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि उपचार सुरू केले. सुरुवातीला सर्वकाही नियंत्रणात येईल असं वाटत होतं. पण हळूहळू त्यांची प्रकृती वेगानं खालावत गेली. शेवटच्या काही दिवसांत त्यांचा लढा खूप कठीण झाला होता. आजारपण इतकं वाढलं की, कुटुंबाला काय घडतंय हे समजण्याची आणि सावरण्याची संधीच मिळाली नाही.
तसंच डॉक्टरांची परवानगी नसताना ते आजारपणातही ते नेपाळला जाऊन शूटिंग करून आले होते, असंही विक्रमादित्यनं सांगितलं. शेवटच्या क्षणी प्रदीप रावत यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं, असंही त्यानं सांगितलं. सगळे डॉक्टर आयसीयूत आले होते, ते बाबांना सीपीआर देत होते, तेव्हाच जाणवलं की, आता सगळं संपलंय, आईच्या अश्रुंचा बांध सुटला…असं तो म्हणाला.
चित्रपटसृष्टीतून वाहिली श्रद्धांजली
रुग्णालयात उपचारादरम्यान प्रदीप यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयातून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं होतं. अंत्यदर्शनासाठी चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी लगान सिनेमातील अनेक कलाकार जवळच्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते. अभिनेता आमिर खान देखील प्रदीप रावत यांना अखेरचा निरोप देताना भावुक झाला होता.
Salman Khan And Sister Alvira Summoned : खोटं आमिष दाखवून फसवल्याप्रकरणी सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा अग्निहोत्रीला कोर्टाची नोटीस, बिझनेसमनने लावलेले गंभीर आरोप
प्रदीप रावत यांनी ‘महाभारत’ मालिकेतील ‘अश्वत्थामा’ या भूमिकेतून विशेष ओळख मिळवली होती. त्यानंतर आमिर खानच्या ‘सरफरोश’, ‘लगाण’ आणि ‘गजनी’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या. विशेषतः ‘गजनी’ चित्रपटातील त्यांच्या मुख्य खलनायकाच्या भूमिकेनं त्यांना देशभरात घराघरांत पोहोचवलं.
Pradeep Rawat: आयुष्यात चढ-उतार, पाच महिन्यात घटस्फोट, आरोप ठरलेले खोटे; प्रदीप रावत यांना साऊथ इंडस्ट्रीत न मागता मिळायचं तिप्पट मानधन
त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. एक उत्कृष्ट कलाकार आणि तितकाच उत्तम माणूस गमावल्याची भावना सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.

