Pradeep Rawat son: उचक्या यायच्या, कोणाला वाटेल हा कॅन्सर असेल, ICUत त्यांना पाहिलं अन् आईच्या अश्रुंचा बांध फुटला; प्रदीप रावत यांच्या मुलाने सांगितला हृदयद्रावक प्रसंग
१९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आदमी सडक का’ या चित्रपटातील हे गाणं आजही लग्नसराईतील वऱ्हाडी मंडळींसाठी खास आहे. या गाण्याशिवाय लग्नातील वरात अपूर्णच वाटते. या चित्रपटात दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा , देवेन वर्मा आणि सुजित कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘आज मेरे यार की शादी है’ या गाण्यानं चित्रपटाला अफाट लोकप्रियता मिळवून दिली.
Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा
Preity Zinta: मी बावरले, खूपच टेन्शन आलं, ‘बटवारा १९४७’ मधील सर्वात कठीण सीन शूट करताना प्रीती झिंटाची झालेली अशी अवस्था, काय घडलेलं नेमकं?
हे गाणं संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलं असून याचं सुंदर शब्द गीतकार वर्मा मलिक यांनी लिहिले होते.मोहम्मद रफी यांच्यासोबत या गाण्यात रवी आणि देवेन वर्मा यांनीही आपले स्वर दिले होते.
शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रभावी अभिनय आणि रफी साहेबांचा आवाज
चित्रपटात या गाण्यावर शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या मित्रांनी केलेला जबरदस्त डान्स आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ऊर्जा यामुळं हे गाणं ‘कल्ट क्लासिक’ बनलं. गाण्याची सुरुवातच मित्राच्या लग्नाचा आनंद आणि भावना व्यक्त करते.हिंदी चित्रपटसृष्टीत लग्नावर आधारित शेकडो गाणी आली, परंतु ‘आज मेरे यार की शादी है’ या गाण्याने जो इतिहास रचला आहे, त्याला तोड नाही. आजही डीजे असो वा पारंपारिक वरात, हे गाणं वाजताच पाहुण्यांचे पाऊल आपोआप थिरकायला लागतात.
