Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; शाळांतील जंक फूडवर कडक निर्बंध
मुंबई -मागील दोन महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) माध्यमातून विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवलाआहे. शाळांमध्ये मिळणारा मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कँटीनमधील आहार पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त असावा, यासाठी ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही मोहीम लागू करण्याचे आदेश दिलेत. मुंढे…
