10 women tourists from satara stranded in nepal flood including close aide of eknath shinde support from government; साताऱ्यातील १० महिला पर्यटक नेपाळमध्ये अडकल्या; शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याचाही समावेश
10 women tourists from satara stranded in nepal flood including close aide of eknath shinde support from government; साताऱ्यातील १० महिला पर्यटक नेपाळमध्ये अडकल्या; शिंदेंच्या निकटवर्तीय नेत्याचाही समावेश
सुधीर पाटील, सातारा: महाबळेश्वरमधील दहा महिला पर्यटक महापुरामुळे नेपाळमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आणि शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मेघा चोरगे आणि त्यांच्या मैत्रिणींचा समावेश आहे. SIT Tours And Travels कंपनीसोबत त्या नेपाळला पर्यटनासाठी गेल्या आहेत. प्रलयाच्या ठिकाणापासून 350 किलोमीटर दूर असलेल्या पोखरा शहरातील हॉटेलमध्ये आम्ही सुरक्षित असून कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मेघा चोरगे यांनी ‘मटा ऑनलाइन’ला दिली.
महाबळेश्वरमधील मेघा चोरगे आणि त्यांच्या मैत्रिणी, अशा दहा जणींचा ग्रुप ट्रॅव्हल्स कंपनी सोबत नेपाळ पर्यटनासाठी गेला आहे. जलप्रलयामुळे नेपाळमध्ये प्रचंड हाहाकार माजला असून महापुरामुळे सर्व पर्यटन ठप्प झाले आहे. धडकी भरवणाऱ्या प्रलयामुळे महाबळेश्वरमधील महिला पर्यटक भीतीच्या छायेत आहेत. सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचा दिलासा जिल्हा प्रशासनाने त्यांना दिला आहे.
पर्यटनासाठी गेलेल्या मेघा चोरगे या शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आहेत. मी व माझ्या नऊ मैत्रिणी, अशा आम्ही दहा जणी SIT tours and travels कंपनीसोबत नेपाळमध्ये आलो आहोत आणि आम्ही सध्या पोखरा या शहरामध्ये सुरक्षित आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यांच्या सोबतच्या काही महिलांना असुरक्षित वाटत असल्याने त्या घाबरल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय देखील काळजीत आहेत.
नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नेपाळमधील पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची माहिती संकलित केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही. त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील (नियंत्रण कक्ष) 02162-232349, 02162-232175, 9657521122 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा. पर्यटकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय साधण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा