Headlines

योगिता चव्हाणचे मंगळागौरीनिमित्त गुलाबी नऊवारी साडी मराठमोळ फोटोशूट,मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले लक्ष – yogita chavan look beautiful in pink saree mangalagaur grab all attention


मंगळागौरीसाठी योगिताचा हा मराठमोळा लुक तुम्हीही नक्की ट्राय करू शकता.गुलाबी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि नाजूक मेकअपमधून मिळवा आकर्षक सणासुदीचा लुक.तुमच्या मंगळागौरीच्या लुकसाठी योगिताची ही स्टाइल तुम्ही ही ट्राय करू शकता.

Marathi Traditional Look of Yogita Chavan
फोटो सौजन्य :- @official_chavan_yogita
अभिनेत्री योगिता चव्हाण आपल्या अभिनयासोबतच हटके आणि पारंपरिक लुक्समुळेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेषतः मराठमोळ्या अंदाजातील तिचे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. नुकताच तिने मंगळागौरीच्या निमित्ताने केलेला पारंपरिक लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि नाजूक मेकअप अशा सुंदर अंदाजात योगिता चव्हाणने आपले फोटो शेअर केले असून, तिच्या या लुकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मंगळागौर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने महिला पारंपरिक वेशभूषेत सजतात. योगितानेही याच पारंपरिक संस्कृतीची झलक आपल्या फोटोशूटमधून दाखवली आहे.तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता. (फोटो सौजन्य :- @official_chavan_yogita)

गुलाबी नऊवारी साडीत खुलला योगिताचा मराठमोळा अंदाज

गुलाबी नऊवारी साडीत खुलला योगिताचा मराठमोळा अंदाज

योगिताने या खास फोटोशूटसाठी गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. गुलाबी रंगामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एकाच वेळी पारंपरिक आणि आकर्षक असा लुक मिळाला आहे. नऊवारी साडीची नेसण्याची पद्धत आणि त्यावर केलेली पारंपरिक स्टाइलिंग यामुळे तिचा संपूर्ण लुक खुलून दिसत आहे. साडीला साजेसा पारंपरिक ब्लाऊज परिधान करत योगिताने आपला लुक अधिक उठावदार केला आहे. नऊवारी साडीमध्ये तिचा आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरील प्रसन्न भाव विशेष लक्ष वेधून घेत आहेत. फोटोमध्ये तिचा साधेपणा आणि पारंपरिक सौंदर्य यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो.

मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले लक्ष

मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले लक्ष

योगिताच्या या लुकमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या गळ्यातील मंगळसूत्र. पारंपरिक पोशाखाला साजेसे मंगळसूत्र तिने परिधान केले असून त्याच्या डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंगळसूत्र हा केवळ दागिना नसून महाराष्ट्राच्या पारंपरिक दागिन्यांमध्ये त्याला विशेष स्थान आहे. योगिताने मंगळसूत्रासोबत इतर पारंपरिक दागिन्यांचाही योग्य पद्धतीने वापर केला आहे. त्यामुळे तिचा लुक अतिशय संतुलित दिसतो. दागिन्यांचा भपकेबाजपणा न करता पारंपरिक सौंदर्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तिच्या या स्टाइलिंगमधून सणासुदीच्या काळात पारंपरिक लुक कसा करता येईल, याची कल्पना अनेक महिलांना मिळू शकते.

नथ आणि पारंपरिक दागिन्यांची खास झलक

नथ आणि पारंपरिक दागिन्यांची खास झलक

नऊवारी साडी म्हटलं की नथ हा दागिना आलाच. योगिताच्या या लुकमध्ये पारंपरिक नथीची झलक पाहायला मिळते. नथीमुळे तिच्या चेहऱ्याला अधिक उठाव मिळाला असून मराठमोळ्या लुकची ओळख आणखी ठळक झाली आहे. गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर पारंपरिक दागिन्यांसोबत नथीचा केलेला वापर तिच्या लुकला पूर्णत्व देतो. हातातील बांगड्या आणि इतर अॅक्सेसरीजमुळे फोटोशूटमध्ये पारंपरिक सौंदर्याची छटा अधिक गडद झाली आहे.

नाजूक मेकअप आणि खुललेले सौंदर्य

नाजूक मेकअप आणि खुललेले सौंदर्य

पारंपरिक पोशाखाचा लुक उठावदार करण्यासाठी मेकअपमध्येही योग्य समतोल राखणे महत्त्वाचे असते. योगिताने आपल्या या फोटोशूटमध्ये फारसा भडक मेकअप न करता नाजूक आणि नैसर्गिक मेकअपला पसंती दिल्याचे दिसते. चेहऱ्यावर हलका बेस, उठावदार डोळे आणि ओठांवर साजेसा रंग यामुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.तिच्या कपाळावरील कुंकू आणि पारंपरिक हेअरस्टाइलने मराठमोळ्या लुकला खास स्पर्श दिला आहे. केसांची रचना आणि त्यात केलेली सजावटही तिच्या संपूर्ण लुकशी अगदी जुळणारी आहे. त्यामुळे गुलाबी नऊवारी साडीतील योगिताचा लुक एकदम सणासुदीचा आणि आकर्षक वाटतो.

मंगळागौरीच्या निमित्ताने संस्कृतीची सुंदर झलक

मंगळागौरीच्या निमित्ताने संस्कृतीची सुंदर झलक

आजच्या आधुनिक काळात पारंपरिक सण आणि संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात कलाकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. योगिताने मंगळागौरीच्या निमित्ताने केलेले हे फोटोशूट याच दृष्टीने खास म्हणावे लागेल. नऊवारी साडी, नथ, मंगळसूत्र आणि पारंपरिक दागिने यामधून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळते. मंगळागौर म्हणजे केवळ पूजा किंवा धार्मिक विधी नाही, तर महिलांच्या उत्साहाचा, एकत्र येण्याचा आणि परंपरा जपण्याचा सण आहे

सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुक

सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुक

योगिताने फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिच्या लुकचे भरभरून कौतुक केले. पारंपरिक साडीतील तिचे सौंदर्य पाहून अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा मराठमोळा अंदाज विशेष आवडल्याचे दिसून येते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा