Chief Minister Devendra Fadnavis on Ahilyanagar Dheeraj Pardeshi Death Case : ‘धीरजच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल’, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला.

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्धार
‘अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही’, असा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत विविध संघटना आणि नागरिकांकडून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना सरकारने गांभीर्यानं घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
Pune-Satara Accident : महाबळेश्वरला फिरायला जाताना काळाची झडप, भरधाव नेक्सॉन दुभाजकाला धडकली; पुण्यातील चार मुलांचा करुण अंत
‘अशा प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही’, असा निर्धारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यामुळे धीरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींवर आता कठोर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलं आहे. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘आपण ज्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहात, त्यावर सरकार सकारात्मक पावलं उचलत आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घ्यावं’, असं आवाहन फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.
मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा
धीरज परदेशी हत्या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी कायदेशीर पातळीवर सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याने या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.
नेमकी घटना काय?
मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा कब्रस्तानाजवळ कर्तव्य बजावत असताना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेला जमावाचा जीवघेणा हल्ला अखेर त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला. शुक्रवारी 7 ऑगस्ट सायंकाळी 10 ते 15 जणांच्या जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांची गेल्या तीन दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं अहिल्यानगर शहर हादरलं असून, संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
जिथे मारहाण झाली, तिथेच अंत्यविधी करा; पत्नीची मागणी
धीरज परदेशी यांच्या पत्नीनं अत्यंत संतप्त मागणी केली आहे. ‘माझ्या पतीला ज्या कब्रस्तानात मारहाण करण्यात आली, त्याच कब्रस्तानात त्यांचा अंत्यविधी करण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीमुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढलं असून, प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
Gadchiroli Student Death :सर्पदंशाच्या घटनेनंतर आश्रमशाळांसाठी नवी ‘एसओपी’
चार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत कारवाई सुरू केली. पोलिसांनी काल रात्री युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याच्या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहे.

