Headlines

Toxic Trailer : प्रचंड हिंसाचार अन् यशचा भयानक अवतार; ‘टॉक्सिक’ सिनेमाचा ट्रेलर रीलिज; कियारा अडवाणीच्या भूमिकेनं वेधलं लक्ष


Toxic Trailer : यशच्या ‘टॉक्सिक’ या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सिनेमातील कियारा अडवाणीच्या भूमिकेनं लक्ष वेधलं आहे.

Toxic movie Trailer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – यशच्या बहुप्रतिक्षित ‘ टॉक्सिक ‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहते बऱ्याच काळापासून सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत होते आणि आता बंगळूरुमधील एका कार्यक्रमात यशच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘टॉक्सिक’ चित्रपटात यशनं दुहेरी भूमिका साकारली आहे. तो राया आणि रुमी या दोन्ही भूमिका साकारत आहे. मात्र, दोन्ही भूमिका खूप वेगळ्या आहेत, ज्यामुळे ‘टॉक्सिक’च्या ट्रेलरची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

‘टॉक्सिक’ सिनेमाचा ट्रेलर

गीतू मोहनदास दिग्दर्शित ‘टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स’ हा भूतकाळात घडणारा एक गँगस्टर ॲक्शन थ्रिलर आहे. हा चित्रपट गुन्हेगारी, सत्ता आणि त्या जगात काम करणाऱ्या लोकांची कथा दर्शवतो. यशने वडील आणि मुलगा अशा दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार दाखवण्यात आला आहे. सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात एक लहान मुलगा आणि यशचं पात्र राया, जखमी अवस्थेत आणि पावसात भिजलेल्या अवस्थेत दिसतो. तो मुलगा रडत माफी मागत म्हणतोय की, ‘मी तुमचं ऐकेन. रागवू नका. मी वचन देतो.’ मग यश मोठ्यानं ओरडतो आणि गोळीबाराचा आवाज येतो. पण गोळी कोणी झाडली हे स्पष्ट होत नाही.

Maharashtra TimesKshama Deshpande : ‘बाबांना अर्धांगवायूचा झटका, अनेक वर्ष एकाच जागी, माझा हात हातात असताना बाबांनी प्राण सोडला’, क्षमा देशपांडेनं सांगितला हृदयद्रावक प्रसंग

कियारा अडवाणीचा लूक

मग, सर्कसमध्ये काम करणारी कियारा दिसते. ती रडत रडत रंगमंचावर येते आणि पार्श्वभूमीवरून एक आवाज येतो, ‘तू तुझं दुःख मुखवटा घालून लपवू शकतेस, पण तुझ्या नशिबात असलेला विनाश नाही.’ त्यानंतर कियारा लहान मुलासोबत दिसते. तो मुलगा तिला म्हणतो, ‘आई, मी तुला सोडणार नाही.’ मग कियारा रडत म्हणते, ‘तुझे बाबा माझा तिरस्कार करतात.’ कियाराच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून अंगावर काटा येतो.पुढे, नयनतारापासून ते हुमा कुरेशी, तारा सुतारियाही यांचीही झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. ट्रेलरच्या प्रत्येक सीनमध्ये पात्राचे वेगवेगळे पैलू दिसत आहेत. दरम्यान, चित्रपटाची कथा गीतू मोहनदास आणि यश यांनी लिहिली आहे. यशसोबत सिनेमात नयनतारा, कियारा अडवाणी , रुक्मिणी वसंत, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत. अक्षय ओबेरॉय, सुदेव नायर आणि अमित तिवारी हे देखील दिसणार आहेत. ‘टॉक्सिक’ सिनेमा २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.