Headlines

FDA Tukaram Mundhe: खाद्यपदार्थांबाबत सर्वाधिक तक्रारी पुणेकरांकडून; ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती – fda tukaram mundhe says pune leads maharashtra in food safety complaints


FDA Tukaram Mundhe: आवश्यक मानकांची पूर्तता करण्याची जबाबदारी उत्पादकांपासून वितरण साखळीतील प्रत्येक घटकाची आहे. ती त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडली पाहीजे, असेही मुंढे म्हणाले.

tukaram mundhe
तुकाराम मुंढे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: भेसळ आणि खाद्यपदार्थांबाबत इतर कोणतीही तक्रार करण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यात राज्यातून सर्वाधिक तक्रारी पुण्यातून दाखल झाल्या आहेत,’ अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी दिली. ‘अस्वच्छ अन्नाबाबत सर्वांत जास्त तक्रारी आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) आयोजित अन्न सुरक्षा परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना मुंढे यांनी ही माहिती दिली. ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने या वेळी उपस्थित होते.

‘एआयचा वापर करणार’
मुंढे म्हणाले, ‘खाद्यपदार्थांबाबत यापूर्वी एखाद्या आस्थापनेने कोणता गुन्हा केला, त्यावर काही कारवाई झाली होती किंवा कसे, याचा इतिहास समजणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एकात्मिक ऑनलाइन प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या विविध आस्थापना आणि त्यांनी खाद्यपदार्थ मानकांचे केलेले उल्लंघन याची माहिती मिळेल.’

Maharashtra TimesMaharashtra Politics : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, पार्थ पवार-प्रफुल पटेल दोघंही मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा
‘ब्लॉकचेन’चा वापर
‘एकाच व्यक्तीचे खाद्यपदार्थ किंवा औषध क्षेत्रातील विविध व्यवसाय असतील, तर ‘ब्लॉकचेन’च्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा मागोवा घेता येईल. भेसळखोरांवरच नव्हे, तर मानकानुसार खाद्यान्न तयार होते किंवा कसे, यावर आम्ही नियामक म्हणून देखरेख करीत आहोत.

खाद्यपदार्थात वापरलेले अन्नघटक तपासा
‘स्वातंत्र्यावेळी देशामध्ये हृदयविकार, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण केवळ ३० टक्के होते. त्यात आता ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याला कारणीभूत म्हणजे आपण घेत असलेला आहार. त्यामुळे केवळ उत्पादनाची किंमत आणि उत्पादन वापरण्यायोग्य तारीख (एक्स्पायरी डेट) न तपासता त्यात वापरलेले अन्नघटक कोणते आहेत, हेदेखील पाहायला हवे,’ असे आवाहन मुंढे यांनी केले.

सोनम वांगचुक यांचं समर्थन, नितीन चंदनशिवेंची नवी कविता; ठाकरेसेनेतील प्रवेशावर काय म्हणाले?

कार्यवाहीची माहिती वरिष्ठांना मिळेल
‘विभागाकडून सुरक्षित अन्न आणि औषधांवर प्राधान्याने लक्ष दिले जात आहेत. खाद्यपदार्थ तयार करण्यापासून त्याची साठवणूक, वाहतूक ते ग्राहकांना सांगितल्यानुसार अन्न-औषधांचे वितरण होते किंवा कसे, अन्नसुरक्षेच्या २२ मानकांचे पालन होते किंवा कसे, हे तपासले जात आहे. मानकांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. तक्रार अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्यांनी वेळेत कार्यवाही न केल्यास वरिष्ठांना त्याची माहिती मिळते,’ असे मुंढे यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा