Headlines

Ramesh Mhatre Controversy | न्यायालयाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रे पोलिसांना शरण… कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरण


मुंबई :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अखेर रविवारी पोलिसांसमोर शरण आलेत.
डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 14 जुलै रोजी जामीन मंजूर केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढत, कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला जामीन तडकाफडकी स्थगित केला.

स्थगितीनंतर म्हात्रे यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी, रविवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. तसेच जर म्हात्रे दिलेल्या मुदतीत विष्णूनगर पोलिसांना शरण आले नाहीत, तर त्यांच्या सर्व स्थावर मालमत्तांवर टाच जप्तीची कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते.

मुंबई हायकोर्टाच्या या दणक्यानंतर म्हात्रे यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. मालमत्ता जप्त होण्याच्या कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असल्याने, रमेश म्हात्रे यांनी ठरवून दिलेल्या वेळेच्या आत कल्याणमधील विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले आणि ते पोलिसांना शरण आले. आता पोलीस त्यांची अधिकृत अटकेची नोंद करून त्यांची वैद्यकीय तपासणी करतील आणि त्यांना पुढील प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करतील.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शास्त्राrनगर रुग्णालयात ड्युटीवर तैनात असलेल्या एका महिला डॉक्टरसह दोन पुरुष डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता, ज्यावरून सत्ताधारी शिवसेनेसह राज्य सरकारवर चौफेर टीका झाली होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत