Headlines

‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो’चे १२ स्थानकं तायर, डेडलाइनही उलटली; तरी उद्घाटन का रखडलं?| Maharashtra Times


Pune Metro 3: मेट्रो मार्गिका ३च्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांचं काम पूर्ण झालं आहे. १५ जुलै रोजी मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुली होईल अशी आशा होती पण ती तारीख उलटूनही प्रवासी अजून हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत.

पुणे मेट्रो ३
पुणे: पुणेकर गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातीस तिसऱ्या मेट्रो मार्गिकेची प्रतीक्षा करत आहेत. १५ जुलै रोजी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार होता अशी घोषणा केली होती. पण ती तारीख उलटली असून अद्याप मेट्रो मार्गिका सुरू झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मार्च महिन्यापासून हे प्रवासी मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत.

उद्घाटन कशामुळे रखडलं?

पुणे शहरातील विविध भागांमधून कर्मचारी मोठ्या संख्येने हिंजवडी आयटी पार्कपर्यंत प्रवास करतात. हे सर्व प्रवासी सध्या रस्ते मार्गे प्रवास करत असल्यामुळे मार्गांवर तासंतास वाहतूक कोंडी होते. मेट्रो मार्ग सुरू होताच या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. पण अजूनही पुणे मेट्रो ३ मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाली नाही आहे. ही अंतिम मंजुरी प्राप्त झाल्याशिवाय मार्गिका खुली करणं शक्य नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.

Maharashtra TimesNew Pune City: नवी मुंबईच्या धर्तीवर ‘नवे पुणे’, पुरंदरमध्ये शहराचा नियोजित विस्तार करावा; नितीन गडकरींची सरकारला सूचना

पुणे मेट्रो ३ चं लोकार्पण दोन प्रमुख टप्प्यात होणार आहे. यापैकी पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. परंतु, अद्याप सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. त्याशिवाय मार्ग सुरू करता येणार नाही. न्यूज १८ त्या वृत्तानुसार, मेट्रो रेल सरक्षा आयुक्तांनी ५ जुलैपासून ते ९ जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांची तपासणी केली. पंरत, या तपासणीचा अहवाल अजून सादर करण्यात आला नाही आहे. अधिकारी अजूनही या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. आयुक्तांना जर काही त्रुटी आढळून आल्या तर अहवालात काही बदल करण्याचे निर्देश दिले जातील. हे बदल केल्याशिवाय मेट्रो मार्ग खुला करणं शक्य नाही अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

पाएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी जून महिन्यात केलेल्या घोषणेनुसार मेट्रो लाइन ३च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन १५ जुलै रोजी होणार होतं. तसेच, उर्वरित ११ पैकी ५ स्थानकांचं काम ऑगस्टच्या अखेपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली होती. पंरतु, दरवेळी प्रमाणे यंदाही ही मुदत संपली पण मेट्रो अद्याप सेवेत दाखल झालेली नाही. त्यामुळे ही तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

Maharashtra TimesDive Ghat Twin Tunnels: दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?

कोणत्या स्थानकांचा समावेश?

पुण्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्र प्रकल्पाला २००७ मध्ये मंजुरी मिळाली होतीय त्यानंतर सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (PPP)मॉडेल अंतर्गत हा मार्ग विकसित केला जाणार आहे. अंदाजे ८,००० कोटींचा खर्च करून ही मेट्रो विकसित केली जात आहे. ही मेट्रो मार्गिका २३.२०३ किमी लांब आहे. पहिल्या टप्प्यात माणमधील मेगापोलिस सोसायटी, क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इनफोसिस फेज २, विपरो फेज २, पॉल इंडिया, शिवाजी चौक, कोर्टयार्ड बाय मॅरियोट, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेल आणि रामनगर या स्थानकांचा समावेश आहे.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो स्थानकं ऑक्टोबरपर्यंत खुली होण्याची शक्यता आहे. या मार्गावर हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बानेर गाव, बानेर, कृषी अनुसंधान, YASHADA, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आरबीआय, कृषी विद्यालय, शिवाजीनगर, जिल्हा व सत्र न्यायालय या स्थानकांचा समावेश असेल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा