फिरकीपटूंनी वाचवलं, पण श्रीलंकेनंही लावली ताकद! दबावातल्या टीम इंडियाला दुसऱ्या दिवसासाठी आव्हान काय?
मुंबई : श्रीलंका दौऱ्याची सुरुवात भारतीय संघासाठी फारशी समाधानकारक ठरलेली नाही. श्रीलंका इलेव्हनविरुद्ध सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमान फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. दिवसअखेर श्रीलंका इलेव्हनने ८ बाद ३६३ धावांचा डोंगर उभारला. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शुभमन गिल या सामन्यात खेळत नसल्याने केएल राहुलने या सामन्यात आज भारतीय संघाचे नेतृत्व केले….
