Headlines

Dada Kondke : प्रकृती अचानक खालावली, ॲम्ब्युलन्स मिळेना, गाडीनं बॉडी घरी आणली; दादा कोंडकेंच्या निधनाचा अंगावर काटा आणणारा प्रसंग


Dada Kondke Death : दादा कोंडके यांनी अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांच्या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसलेला. दादा कोंडके यांच्या मृत्यूचा प्रसंगही अंगावर काटा आणणारा आहे.

Dada Kondke Death Incident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून आजही चाहते त्यांचे सिनेमे आवर्जून बघतात. दादा कोंडके त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असायचे. त्यांच्या मृत्यूचा प्रसंगही अंगावर काटा आणणारा आहे. एका मुलाखतीमध्ये मराठी लेखिका अनिता पाध्ये यांनी दादा कोंडके यांच्या मृत्यूचा प्रसंग सांगितलेला.

दादा कोंडके यांच्या मृत्यूचा प्रसंग

दादा कोंडके यांचं १४ मार्च १९९८ रोजी निधन झालं. एकदा रात्री अचानक दादा कोंडके यांची प्रकृती खालावली आणि त्यांना सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यासोबत जे लोक काम करायचे तेच त्यांच्यासोबत रहायचे. हा प्रसंग सांगताना अनिता पाध्ये म्हणाल्या की, ‘दादांचं अचानक निधन झालं. रात्री पाऊणे तीन वाजता त्यांचे मॅनेजर जीतू भाई यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले की, दादांची प्रकृती बिघडली आहे. आम्ही त्यांना सश्रृषाच्या हॉस्पिटलमघ्ये घेऊन जातोय. तुम्ही याल का? मी येते म्हणून सांगितलं. दादांसोबत फक्त त्यांच्यासोबत काम करणारे चार जण राहायचे.’

Maharashtra TimesTanya Puri : ‘विवाहित असूनही निम्म्या वयाच्या मुलींसोबत संबंध ठेवतो’, डिटेक्टिव्हनं केली बॉलिवूड अभिनेत्याची पोलखोल
‘मी माझ्या भावाला सांगितलं की, तू दादांच्या नातेवाईकांना फोन कर. त्यांची बहिण पुन्हाला राहायची. दादांना ॲम्ब्युलन्सने घेऊन जायचं होतं. त्या काळात जास्त ॲम्ब्युलन्स नव्हत्या. हॉस्पिटलमध्ये दारातच ॲम्ब्युलन्स होती. पण, त्यांनी सांगितलं की, तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, पण ते रजिस्टर लॉकरमध्ये आहे आणि आता ड्रायव्हर नाहीये. एक शिवसेनेची ॲम्ब्युलन्स होती, पण ती मिळाली नाही. नंतर मी विजय कोंडके यांना फोन केला. शेवटच्या काळात विजय यांच्यासोबत दादा कोंडके यांचे संबंध चांगले नव्हते. तरीही मी त्यांना फोन केला आणि दादांबद्दल सांगितलं. दादांच्या दोन जवळच्या मित्रांना कळवलं. त्यावेळचे कामगार मंत्री साबीर शेख यांना फोन केला पण ते बाहेर होते. दोन तास हॉस्पिटलमध्ये दादांच्या प्रेताजवळ मी एकटीच होते.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

‘तेव्हा ॲम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे मी आणि दादांचे दोन मित्र दादांच्याच कॉन्टेसा गाडीतून त्यांचं प्रेत घेऊन आलो. बालमोहनच्या गल्लीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर दादा राहायचे. आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रेत घेऊन गेलो आणि संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांचे नातेवाईक, राजकारणी नेते अंत्यसंस्काराला आलेले. बाळासाहेब ठाकरेसुद्धा आलेले. ते दादांच्या प्रेताजवळ बसून त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होते.’ असं अनिता यांनी शेवटी सांगितलं.